नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात काही अंतरात खांद्ये पालट होणे हा बदली होण्यातला एक प्रकार आहे. पण एका विभागातील खांदे पालट होणे हा वेगवेगळ्या विषयांना जन्म देणारा मुद्दा आहे. असेच खांदे पालट नांदेड पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेत सुरू आहे. पण खांदे पालटाच्या आदेशावर गुपचूप स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.
पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखा ही एक महत्वाची शाखा आहे. साध्या भाषेत पोलीस अधिक्षकांच्या उजव्या हाताचे काम स्थानिक गुन्हे शाखा करते आणि डाव्या हाताचे काम जिल्हा विशेष शाखा करते असे म्हणतात. जानेवारी महिन्यात स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक पदावर उदय खंडेराय विराजमान झाले. त्यानंतर माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काही जणांच्या फक्त कागदोपत्री बदल्या केल्या. त्यानंतर नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेत नवीन पोलीस अंमलदार आणले.
स्थानिक गुन्हा शाखेमध्ये फसवणूक, प्रतिबंधात्मक कार्यवाही, ऍट्रॉसिटी, हद्दपारीचे प्रस्ताव, वॉरंट तामील करणे, बालकांच्या संदर्भाने दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दलची माहिती जमवणे याच्यासह अनेक अशी कामे आहेत जी पोलीस अंमलदारांनी करायची असतात आणि त्याचा अहवाल वरीष्ठ कार्यालयांना पाठवायचा असतो. या शिवाय जिल्हा भरात अशी बरीच कामे असतात जी आम्ही बातमीमध्ये लिहु शकत नाही. मागील दोन-चार दिवसांपासून स्थानिक गुन्हा शाखेत एक पोलीस अंमलदार इतर पोलीस अंमलदारांच्या स्वाक्षऱ्या एका कागदावर घेत आहे. सर्व सामान्य पणे पोलीस अंमलदारांच्या नावाने काही आदेश निघाला असेल तर त्या आदेशाची एक प्रत त्यांना देणे आवश्यक असते.पण फक्त स्वाक्षरी घेवून त्यांना तोंडी सांगितले जात आहे की तुमच्याकडे अमुक काम आहे. सोबतच पोलीस अंमलदारांना बीट आहेत. ते बीट सुध्दा बदलले आहेत. बीट हा शब्द पत्रकारांमध्ये सुध्दा चर्चेचा आहे. कारण पत्रकारांना सुध्दा वेगवेगळे बीट असतात आणि एका बीटमध्ये दुसरा पत्रकार काही स्वारस्य दाखवत असेल तर बीटचा पत्रकार मोठ्या जोरदारपणे रागवतो. आता स्थानिक गुन्हा शाखेतील बीट बदलल्यामुळे बरेच बदल होणार आहेत. सध्या नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाची असलेली परिस्थिती कडक आहे आणि या कडक परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदारांना दिलेल्या नवीन बीटचा काय परिणाम समोर येईल हे आज काही सांगता येणार नाही. जशा-जशा घटना घडतील. तशा घडना प्रसारीत करणे हे आमचे कर्तव्यच आहे.
Post Views: 287