नांदेड-तामसा रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ऍटोतील एक प्रवाशी ठार; इतर जखमी

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-तामसा रस्त्यावर एका ट्रकने ऍटोला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोन जखमी झाले आहेत.
दि.25 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड-तामसा रस्त्यावरील लोहा पाटी येथे एका ट्रकने एका ऍटोला धडक दिली. या ऍटोमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी नामदेव गोविंद डवरे (38) रा.वाडी ता.हदगाव

जि.नांदेड यांचा मृत्यू झाला. ऍटोमधील इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तामसा पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. या धडकेत ऍटोचा चेंदा-मेंदा झाला आहे . ऍटोचा क्रमांक एम.एच.26 ए.के.3460 आहे. ऍटोला धडक देणाऱ्या ट्रकचा क्रमांक एम.एच.26 ए.डी.0874 आहे. वानवाडी येथील तुळशीराम श्रीहरी मुकाळे(50), बालाजी धोंडबा गवळे (45) आणि पुंजाराम भागवत खरोडे (28) हे जखमी आहेत. या सर्वांना शासकीय रुग्णालया विष्णुपूरी येथे उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *