*आरोपीविरुद्ध ऍट्रॉसीटी व मारहाणीचा गुन्हा दाखल*
*पिरबुऱ्हाननगर परिसरात सफाई कामगारांचा काम न करण्याचा निर्धार – कॉ. गणेश शिंगे*
नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील सफाई महिला कामगार भारतबाई प्रल्हाद लोणे यांना काही कारण नसताना बेदम मारहाण करणाऱ्या पिरबुऱ्हाननगर येथील माथेफेरु सादीक शेख यास तत्काळ अटक करुन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच पिडीत महिलेला न्याय मिळेपर्यंत पिरबुऱ्हाननगर परिसरातील सफाईकामावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे कॉ. शिंगे यांनी सांगितले.
नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्र. 5 येथील पिरबुऱ्हाननगर गल्ली नं. 28 येथील सफाई कामासाठी श्रीमती भारतबाई प्रल्हाद लोणे (वय 56, रा. श्रावस्तीनगर) या आपले दैनंदीन कर्तव्या पार पाडत असताना पिरबुऱ्हाननगर येथील गल्ली क्र. 18 जवळ काम करत असताना आरोपी सादीक शेख हा येऊन आर्वच्च भाषेत व जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करु लागला. सदर महिला कामगारास काही कारण नसताना मारहाण होत असताना सदर महिला भितीपोटी सायराभेरा पळत होती. तेथील कोणत्याही नागरिकाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला रोखले नाही. त्यामुळे महिला कामगारास अतिशय आर्वाच्च व जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करीत होता. सदरची घटना सोबत असलेल्या महिला कामगारांनी स्वच्छता प्रभारी निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली असता स्वच्छता निरीक्षकांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सदर कामगारास घरी जाण्याचा सल्ला दिला. सदर महिलेने मनपाचे माजी सभापती सय्यद फारुख अली यांना सांगितले असता सादीक शेख याने साली तु हमारा आपस मे झगडा लगाती क्या, असे म्हणत परत तोंडावर व छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. स्वच्छाता महिला कामगार भारतबाई प्रल्हाद लोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र. 530/2024 कलम -296, 115 (2), बी.एन.एस.सह कलम 3 (1), (आर) (एस) (अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 52