नांदेड (प्रतिनिधी)-आपसातील व्यवहाराच्यानंतर चार जणांनी एका व्यक्तीचा रस्ता आडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडे असलेले 4 लाख 25 हजार रुपये घेवून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर आनंद दिघे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11.40 वाजेच्यासुमारास भक्तसिंघ चौक कौठा येथे त्यांना पिंटू लोंडे, गजू लोंडे, शिवराज तांबोळी आणि एक अनोळखी व्यक्ती भेटले. कोणत्या तरी यांत्रिकी संदर्भाने त्यांचा अपसात व्यवहार झालेला होता. तरी त्या तिघांनी मधुकर दिघेचा रस्ता आडवून, लाथा बुक्यांनी मारहाण करून, जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडील 4 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम अपहार केला आहे. या संदर्भाचा गुन्हा क्रमांक 963/2024 नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड हे करीत आहेत .
Post Views: 274