नांदेड(प्रतिनिधी)- कलामंदिरच्या डाव्या बाजूला गल्ली असलेल्या दारु दुकानाजवळ पाच-सहा लोकांनी एका व्यक्तीचे 3 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि त्याच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून नेली आहे.
अखरगा ता.मुखेड येथील आणि सध्या भावसार चौकात राहणारे चालक रविकिरण गंगाधर फिरंगवार(35) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑक्टोबरच्या दुपारी 4 .30 वाजेच्यासुमारास ते कला मंदिरच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्लीतून पायी जात असतांना संजय वाईन शॉपसमोर 5 ते 6 जणांनी बळजबरीने त्यांच्या खिशातील 3 हजार 800 रुपये आणि त्यांच्या हातातील बॅग हिसकावून नेली आहे. वजिराबाद पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 522/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम हे करीत आहेत .
Post Views: 408