नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रा .राजू सोनसळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज 


नांदेड -नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे हे उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .यासाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. आगामी होऊ घातलेल्या 16- नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व तथा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांना सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती. प्रा. सोनसळे हे गेले अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीसह विद्यार्थी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते आणि नेते म्हणून नावलौकिक मिळवणारे युवा नेतृत्व राहिले आहेत.

महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय चळवळीला वाहून घेतलेल्या प्रा. राजू सोनसळे यांनी अनेक सामाजिक लढ्यातही सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक राजकारणाची दखल घेत सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी प्रा. सोनसळे यांची रिपब्लिकन सेनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर त्यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी ही बहाल केली. या अनुषंगाने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता प्रा. राजू सोनसळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली क्रांतीज्योती महात्मा फुले, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहे. रॅलीचा समारोप झाल्यानंतर प्रा. सोनसळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव माधव दादा जमदाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. आयोजित रॅलीत आंबेडकरी चळवळीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.


Post Views: 120






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *