नांदेड(प्रतिनिधी) – विमानतळ पोलीसांनी एका चारचाकी वाहनात बळजबरीने कोंबून कु्ररतेची वागणूक देत वाहतुक होणारे तीन गोवंश जातीचे बैल आसना पुलाजवळ पकडले आहेत.
पोलीस अंमलदार दारासिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ येथील पोलीस उपनिरिक्षक बालाजी मस्के, पोलीस अंमलदार बंडू जाधव, ज्ञानेश्र्वर भिसे, कुरूकवाड आणि सिद्दीकी हे गस्त करत असतांना सकाळी 8 वाजेच्यासुमारास आसना पुल सांगवी येथून जात असलेली चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.38 ई.3193 रोखून तपासणी केली असता त्या वाहनामध्ये तीन गोवंश जातीचे बैल अत्यंत निर्धयीपणे कोंबून त्यांची वाहतुक होत होती . विमानतळ पोलीसांनी तिन गोवंश जातीचे बैल 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे चार चाकी वाहन 2 लाख 50 हजार रुपयांचे असा एकूण 3 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जवळाबाजार ता.औंढा जि.हिंगोली येथील वाहन चालक शेख मोसीन शेख मोईन आणि वाहनाचा मालक मुद्दसिर कुरेशी सलीम कुरेशी या दोघांविरुध्द प्राणी छळ प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा क्रमांक 438/2024 प्रमाणे दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार , अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराश धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण आणि पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
Post Views: 1