नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड च्या स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरलेल्या तिन दुचाकी गाड्या 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, तिरुपती तेलंग, संदीप घोगरे, राजु डोंगरे, अमोल घेवारे आणि सायबर विभागातील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, व्यंकटेश सांगळे यांनी 14 ऑक्टोबर रोजी माळटेकडी परिसरात पांडूरंग बाबाराव जाधव(20) रा.कुदळा ता.उमरी जि.नांदेड, आनंद नागोराव कदम(20) रा.बेंद्री ता.नायगाव आणि व्यंकटेश उर्फ नायडू दादाराव जाधव (19) रा.महाटी ता.उमरी ह.मु.बळवंतनगर नायगाव या तिघांना पकडले. त्यांच्याकडून पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोलीस ठाणे नायगाव येथील दोन असे एकूण 3 गुन्हे दुचाकी संदर्भाचे उघडकीस आले. या गुन्ह्यातील तक्रारीप्रमाणे चोरीला गेलेल्या तीन दुचाकी गाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आनंद कदम आणि व्यंकटेश जाधव यांच्याकडून जप्त केलेल्या दुचाकी 70 हजार रुपयांच्या आहेत आणि बाबाराव जाधव यांच्याकडून जप्त केलेली दुचाकी 80 हजार रुपयांची आहे . बाबाराव जाधव पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे आणि आनंद कदम आणि व्यंकटेश उर्फ नायडू जाधव या दोघांना पुढील तपासासाठी नायगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार , अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराश धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
Post Views: 99