7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या पुर्वी राज्य सरकारने 7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्याच्या उपविभाग बिलोली येथे शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या सात पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील रिकाम्या झालेल्या बिलोली उपविभागात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय जालना येथील शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे. इतर बदल्या झालेले सहा पोलीस उपअधिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. राजकुमार बालाजी केंद्रे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी (उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत उपविभाग जि.हिंगोली), पांडूरंग बाबासाहेब गोफणे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय रायगड(उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर उपविभाग जि.भंडारा), रणजित नारायण सावंत-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धाराशीव(उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग), श्रीकांत औदुंबर डिसले-पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर(उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उदगीर जि.लातूर), आनंद विष्णु चव्हाण-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर(उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली उपविभाग जि.भंडारा), प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर(उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा उपविभाग जि.भंडारा).


Post Views: 270






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *