नांदेड(प्रतिनिधी)-दहेली गावाच्या शेत शिवारातून माझे 10 क्विंटल कापुस पिक 4 जणांनी चोरून नेल्याची तक्रार दिल्यानंतर सिंदखेड पोलीसांनी त्या गुन्हेगारांच्या नावासह गुन्हा दाखल केला आहे.
82 वर्षीय तुळशीराम नामदेव पारसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे दहेली गाव ता.किनवट येथील माझ्या शेत शिवारातून 20 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान वनदेव गणेश कचरे, प्रकाश गणेश कचरे, रमेश गणेश कचरे, संतोष प्रकाश कचरे यांनी माझ्या शेतातील 10 क्विंटल कापूस चोरून नेला आहे. सिंदखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 128/2024 नुसार नोंदवली आहे. पोलीस अंमलदार कोंडापलपुलवार हे करीत आहेत.
Post Views: 37