नांदेड(प्रतिनिधी)-गुरुजी चौक, देवरावनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विनकर कॉलनीमधील एका पतसंस्थेचे चॅनेलगेट तोडून 7 हजार रुपयांचे मॉनीटर चोरले आहे. ही पतसंस्था गोविंद कोकुलवार यांची आहे.
अनिरुध्द शामसुंदर चुनूकवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑक्टोबरच्या सकाळी 8 ते 26 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. कोणी तरी चोरट्यांनी देवरावनगर येथील त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि तेथे एका ड्राव्हरमध्ये असलेल्या चॅबीने कपाट उघडले आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे असा 4 लाख 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 436/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार कुकडे अधिक तपास करीत आहेत.
इतवारा भागात माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांची हरीओम नागरी पतसंस्था आहे. त्यांचे पुत्र नागेश कोकुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26-27 ऑक्टोबरच्या रात्री कोणी तरी त्या पतसंस्थेचे चॅनेल गेट वाकवून आत प्रवेश केला आणि 7 हजार रुपये किंमतीचे एक मॉनेटर चोरुन नेले आहे. इतवारा पोलीसांनी या घटनेनुसार गुन्हा क्रमांक 396/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मोहन हाके हे करीत आहेत.
Post Views: 48