नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 11 गोवंशातील बैल पकडून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
देगलूर पोलीसांनी दोन वेगवेेगळ्या कार्यवाहीमध्ये 27 ऑक्टोबर रोजी एकूण 11 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची किंमत 3 लाख 37 हजार रुपये आहे. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जियाउद्दीन गुलाम रब्बानी (54) रा.मदीना कॉलनी नरंगल रोड देगलूर आणि जमील महेबुब कुरेशी (45) रा.खाजाबाबानगर देगलूर यांच्याकडे कत्तलीच्या उद्देशाने 11 बैल बांधून ठेवले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकून पोलीसांनी ते 11 बैल जमा केले आहेत आणि दोन स्वत: गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी देगलूरचे पोलीस निरिक्षक मारोती मुंडे, पोलीस उपनिरिक्षक नरहरी फड, गोपाळ इंद्राळे, पोलीस अंमलदारा माधव मरगेवाड, कृष्णा तलवारे, सुधाकर मलदौडे, राजवंतसिंघ बुंगई यांचे कौतुक केले आहे.
Post Views: 61