नांदेड(प्रतिनिधी)-पाळज व रहाटी सिमेवरील अंतर राज्य सिमेवर सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोलीस पथकांनी काल दि .28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास एक टॅम्पो पकडला त्यात 12 लाख 66 हजार 400 रुपयांच्या शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा पदार्थ होता.
सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अंतर राज्य सिमेवर पोलीस, महसुल यांचे संयुक्त पथक निगराणी करीत आहे. यामध्ये महत्वपुर्ण मुद्दा पैशांची आवक होते आहे काय? हा आहे. काल पाळज व राहाटी येथील एसएसटी पॉईंट जवळ पोलीसांनी एम.एच.37 टी 3601 ही टॅम्पो तपासली. या टॅम्पोमध्ये मानवी शरिरास अपायकारक, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटखा सापडला. या गुटख्याची किंमत 12 लाख 66 हजार 400 रुपये आहे. पोलीसांनी टॅम्पोसुध्दा जप्त केला आहे. त्याची किंमत 8 लाख रुपये आहे. एसएसटी पथकावरील पोलीस अंमलदार हलु प्रल्हाद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 416/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी सदरात अबरार अहेमद खान मोहम्मद खान याचे नाव आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांनी भोकरचे पोलीस निरिक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरिक्षक सुरेश जाधव, पोलीस अंमलदार भिमराव जाधव, प्रकाश वाळवे, लहु राठोड, गुरुदास आरेवार, प्रमोद जोंधळे आणि मंगेश क्षीरसागर यांचे उत्कृष्ट कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
Post Views: 46