नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या विधान निवडणुकीदरम्यान आलेल्या दिवाळी या सणामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टया मिळणार नाहीत याचे नियोजन करतांना सहमुख्य निवडणुक अधिकारी तथा उपसचिव एम.आर.पारकर यांनी तयार केलेल्या नियोजनाचे आदेश महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे.
भारत निवडणुक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 चा कार्यक्रम घोषित केल्यानंतर मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांचे कार्यालय शनिवार, रविवार, तसेच सार्वजिक सुट्ट्यांच्या दिवशी सुरू आहे. दि.1 नोेहेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळीचा सण आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर या दिवशी मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सुट्टी देण्यात आली आहे. तरी पण या दिवशी ज्या कार्यालयातील कामकाज अविरत सुरू ठेवणे आवश्यक आहे त्या कार्यालयाच्या प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सुचना द्यावी.
2 आणि 3 नोव्हेंबर रोजी कामाची निकड, आवश्यकता विचारात घेवून कोणते अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे याचा निर्णय संबंधीत विभागाच्या अवर सचिवांनी त्यांच्या स्तरावर घ्यायचा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुध्दा नियमित पणे 24 तास सुरू राहिल. या आदेशात पोलीस विभागाचा उल्लेख नाही. त्यांना तर निवडणुक संपेपर्यंत साप्ताहिक सुट्ट्या सुध्दा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची सेवाही अविरतपणे सुरू राहणार आहे.
Post Views: 65