नांदेड(प्रतिनिधी)-नंादेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआय फोडून चोरट्यांनी 11 विद्युत मोटारी आणि 4 सिलिंग फॅन असे साहित्य चोरून नेले आहे. तसेच उत्कर्ष बार येथे तिन चोरट्यांनी 15 हजार रुपये लुटले आहेत.
शेख शादुल्ला शेख बाबन हे आयटीआयचे उपप्राचार्य आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑक्टोबरच्या सकाळी 6 ते 29 च्या सकाळी 11 वाजेदरम्यान माळटेकडी पुलाजवळील आयटीआय या शिक्षण संस्थेचा मागील पत्रा काढून चोरट्यांनी त्यातील 11 विद्युत मोटारी आणि 4 सिलिंग फॅन असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरू नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही चोरीची घटना गुन्हा क्रमांक 987/2024 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार यालावार अधिक तपास करीत आहेत.
अमृतप्रसाद दौलतप्रसाद जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता पासदगाव येथील त्यांच्या मालकीच्या उत्कर्ष बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांनी खंजीरचा धाक दाखवून बारच्या कॉंन्टरमधील 15 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. लिंबगाव पोलीसांनी बारमधील ही बळजबरी चोरीची घटना गुन्हा क्रमांक 158/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक सय्यद हे करीत आहेत.
Post Views: 124