खरंच आपण दिपावळी का साजरी करतो, हे आपल्याला माहित आहे का?


र आपण कोणालाही विचारलं, “आपण दिपावळीका साजरी करतो?” तर आपणास नेहमीच धुसर उत्तर मिळतील – दिवे लावतो, फटाके फोडतो, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, वगैरे वगैरे. पण खरंच आपण दिपावळी का साजरी करतो याचा अर्थ आपल्याला समजतो का?

दिपावळी हा शब्द ‘दिवा’ (तेलाचा दिवा) + ‘अवली’ (ओळ) या दोन शब्दांपासून बनला आहे. म्हणूनच लोक घरभर दिवे लावतात, प्रत्येक कोपरा उजळून काढतात. सनातन धर्मानुसार, अध्यात्मिक सणांमुळे आपल्यामधील तसेच समाजातील सत्त्ववृद्धी (जीवनशक्ती/ऊर्जा/प्राण) होते. दुर्दैवाने आजकाल दिपावळी  केवळ नावापुरती किंवा त्यामागील अध्यात्मिक महत्त्व समजून न घेता साजरी केली जाते. परिणामी, दिपावळी हा धूर आणि आवाजाचा प्रदूषण करणारा सण, महागड्या भेटवस्तू, नवीन कपडे, सजावटीची फुशारकी, विविध खाद्यपदार्थ यांसारख्या बाह्य गोष्टींपर्यंत सीमित राहिला आहे. अनेकजण  ह्या फटाक्यांमुळे जखमीही होतात आणि आपण दुसऱ्या सारखा भव्य सण आपण साजरा करू शकत नाही ह्या दडपणाचा किती तरी पालकांना त्रास होतो

दिपावळी प्रत्येक दिवसासोबत असलेली वेगवेगळी कारणे आहेत. एकूणच, दिपावळी म्हणजेच “सत्याचा असत्यावर, प्रकाशाचा अंधारावर, न्यायाचा अन्यायावर, आणि शुभाचा अशुभावर विजय.” यावेळी आपण दिपावळी सण अध्यात्मिक दृष्टिकोनातून साजरा करण्याचा निर्धार करूया, जेणेकरून त्याचे अधिकाधिक आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतील.

दिपावळी हा वर्षातील सर्वांत आनंददायी व मोहक काळ आहे. दिपावळी म्हणजे अक्षरशः “प्रकाशाची ओळ.” हा प्रेम, प्रकाश आणि आनंद यांचा काळ आहे; जिथे जगभरातील भारतीय जल्लोषात बुडून जातात.

दिपावळीअमावस्येच्या रात्री, आश्विन महिन्यातील शेवटच्या दिवशी साजरी केली जाते. हि रात्र सगळ्यात जास्त अंधारी रात्र असते ज्यात प्रकाश किंवा अग्नीचे अस्तित्व नसते. या अंध:काराशी लढण्यासाठी घराच्या पुढील अंगणापासून मागच्या दरवाज्यापर्यंत दिवे लावले जातात, ज्यामुळे संपूर्ण घर  आणि वातावरण प्रकाशमय होते.

पर्यावरणातील प्रत्येक घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. म्हणूनच, आपण आपल्यातील अज्ञानाच्या अंधाराला दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाने स्वतःला उजळवायला हवे. दिवे हे केवळ प्रतीक आहेत; खरी दिपावळी आपल्या अंतःकरणात व्हायला हवी.

दिपावळी विविध दिवस आणि त्यांचे अर्थ

गोवत्स द्वादशी: दिपावळी सुरुवात गोवत्स द्वादशी (बासु बारस) किंवा काही भागात गुरु द्वादशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिवसापासून होते. या दिवशी गाय आणि वासराचे पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्णाला गाईंबद्दल विशेष प्रेम होते. असे मानले जाते की गाईमध्ये सर्व देवता निवास करतात, आणि गाईच्या सान्निध्यात विशेष सकारात्मक ऊर्जा असते. पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात गाय असायची, जी दुधासारख्या पोषक घटकांची गरज भागवायची. या पहिल्या दिवशी गायीसाठी कृतज्ञता व्यक्त करून दिपावळीची सुरुवात केली जाते.

धनतेरस किंवा धन त्रयोदशी: स्कंद पुराणानुसार, या दिवशी यमदीपम मानला जातो. संध्याकाळी यम दीपाची पूजा करून घराबाहेर दिवा लावला जातो. यम, मृत्यूच्या देवतेची पूजा करून अकाली मृत्यूला टाळण्याची प्रार्थना केली जाते.

आश्विनस्याऽसिते पक्षे त्रयोदश्यां निशामुखे ।।
यमदीपं बलिं दद्यादपमृत्युर्विनश्यति।।  – स्कंदपुराण,

दुसऱ्या कथेनुसार, या दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृताची कळशी घेऊन प्रकट झाले. आयुर्वेदानुसार, धन्वंतरी देवतेचा जन्मदिवस म्हणून वैद्य मंडळी या दिवशी त्यांची पूजा करतात.

धन म्हणजेच आपले जीवन सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक ते सर्व काही. धनतेरस हा दिवस व्यापाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी ते आपल्या तिजोरीची पूजा करतात. त्यांच्यासाठी दिपावळी ते पुढील दिपावळी असे व्यापारी वर्ष असते आणि म्हणूनच या दिवशी नवीन वर्षाच्या आर्थिक वर्षाची सुरुवात करतात.

नरक चतुर्दशी: या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला. नरकासुर शरीरातील तामसिक प्रवृत्तींना दर्शवतो. म्हणूनच, या दिवशी पहाटे उठून आयुर्वेदिक औषधांनी अभ्यंगस्नान केले जाते, जेणेकरून शरीरातील तामसिकता कमी होईल. मला नेहमी सांगितले जायचे की, जर या दिवशी लवकर उठलो नाही तर नरकात जावे लागेल पण आता खऱ्या कारणाची जाणिव होते.

लक्ष्मीपूजन: अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केली जाते, जेणेकरून आयुष्यात समृद्धी व भरभराट लाभेल. राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले होते, याचा आनंद साजरा म्हणूनही हा दिवस मानला जातो. या दिवशी आपण आपल्या आत दडलेल्या नकारात्मक प्रवृत्तींना ओळखून त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्या मूळ स्वभावात प्रेम आणि शांती आहे. या आत्म-प्रबोधनाच्या क्षणी खरी दिपावळी सुरू होते, ज्याचा उत्सव आपण दिवे, मिठाई आणि आनंद पसरवून साजरा करतो.

बलिप्रतिपदा: दिपावळीचा पुढचा दिवस बलिप्रतिपदा असतो. हा दिवस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी येतो. हा दिवस भगवान विष्णूने असुर राजा बलीवर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा व्यवसायिक नववर्षाचा पहिला दिवसही मानला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वताचे पूजन केले जाते, ज्याने श्रीकृष्णाच्या नेतृत्वात संपूर्ण गावाला वादळातून संरक्षण दिले होते.

यमद्वितीया (भाऊबीज): या दिवशी यमदेव आपल्या बहिणी यमुनाकडे भोजनासाठी गेले होते. या दिवसाचे नाव यमद्वितीया असे पडले. हे आपल्याला स्मरण करून देते की, प्रत्येक मानवाचा मृत्यू निश्चित आहे, आणि आपण येथे फक्त थोडा काळ आहोत. त्यामुळे आपल्याला कृतज्ञ राहून चांगली कामे करण्याची जाणीव ठेवावी, केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही.

दिपावळी हा सण आपल्या आतल्या चांगुलपणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. गोवत्स द्वादशीपासून आपल्या आयुष्यातील कृतज्ञतेचा प्रारंभ करावा, धनतेरसला आपल्या स्वास्थ्य व धनाची काळजी घ्यावी, नरक चतुर्दशीला आळसावर मात करावी, लक्ष्मीपूजनाला आत्मज्ञानाच्या प्रकाशाने सन्मार्गावर यावे. प्रतिपदेला नवीन संकल्पांसह नववर्षाची सुरुवात करावी, राजा बलीच्या उदारतेची आठवण ठेवून आपणही उदार राहावे. आणि शेवटी, जीवनाचा आनंद घेत राहावे कारण आपल्याला येथे आलेला काळ हा अगदीच थोडा आहे.
आपल्याला आनंद, समाधान आणि शांतीने भरलेली दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा!क शुभेच्छा!

-कल्याणी रामप्रसाद खंडेलवाल 


Post Views: 57






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *