गंगाखेड(प्रतिनिधी)-गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांच्या चोरीच्या 7 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक दिपक वाघमारे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या गुन्हे शोध पथकातील प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार बुधोडकर, युसूफ खान पठाण, शंकर रेंगे, गौस खान पठाण, परसराम परचेवाड, अनंत डोंगरे, सतिशकुमार पांढरे आदींनी दुचाकी चोरीवर लक्ष केंद्रीत करून सिंगनापुर येथील योगेश पांचाळ आणि मेराळ सांगवी येथील वैभव जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी पुणे येथून चोरलेल्या तीन दुचाकी गाड्या, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या दोन दुचाकी गाड्या आणि इतर दोन अशा सात दुचाकी गाड्या काढून दिल्या आहेत. या दुचाकी गाड्यांची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. यातील एक गाडी गंगाखेड येथील गॅरेजवर उभी होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांनी गंगाखेड पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 90