नांदेड(प्रतिनिधी)-ऑफिसर कॉलनी येथील एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 64 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शेख खाजा शेख नबी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबरच्या दुपारी 2.30 ते रात्री 9 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप, कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे 2 लाख 4 हजार 510 रुपयांचे आणि रोख रक्कम 60 हजार रुपये असा एकूण 2 लाख 64 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 450/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने हे करीत आहेत.
Post Views: 81