नायगाव ते भोकर उमरी रस्त्याावर 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून


नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव पासून भोकर-उमरी रस्त्यावर एका चाळीस वर्षीय अनोळखी माणसाचा खून केलेल्या अवस्थेतले प्रेत सापडले आहे. रामतिर्थ पोलीसांनी या संदर्भाने कोणी व्यक्ती गायब असेल तर त्यांनी रामतिर्थ पोलीसंाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
आज दिवाळीनंतरची पहिली पहाट उजाडताच नायगाव पासुन भोकर-उमरी जाणाऱ्या रस्त्यावर एक प्रेत दिसले. या संदर्भाची माहिती मिळताच रामतिर्थचे पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथकत तिकडे रवाना झाले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मरणाऱ्या व्यक्तीचे वय 40 वर्ष असावे. आज त्याची कोणतीही ओळख पटवता येईल असे काही चिन्ह त्या प्रेतमध्ये सापडले नाही. पोलीसांनी कायदेशीर कार्यवाही करत ते प्रेत उचलून रुग्णालयात नेले आहे.
रामतिर्थ पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या घरातील, आपल्या आसपासचा कोणी व्यक्ती गायब असेल आणि त्याचा संपर्क होत नसेल तर रामतिर्थ पोलीसांशी संपर्क साधून झालेल्या घटनेतील व्यक्ती गायब झालेला व्यक्ती आहे काय ? याची शाहनिशा करावी.


Post Views: 30






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *