नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहित पुरुषासोबत दुसऱ्या विवाहित महिलेच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर प्रेमीने आत्महत्या केली. त्यानंतर मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन त्यांच्या नवऱ्याची प्रेमीका आणि प्रेमीकेचा नवरा यांच्याविरुध्द आखाडा बाळापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप आरोपी सापडत नाहीत.
कळमनुरी तालुक्यातील आप्पा देववाडी बोडी येथे राहणाऱ्या संगिता संजय डुकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांचे पती संजय डुकरे यांच्या मोबाईलवर भोकर येथील विवाहित महिला प्रेमलता संजय धनवे यांचा फोन आला. त्यामुळे माझे पती त्यांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी चार चाकी वाहन घेवून गेले. संध्याकाळी 6 वाजता संजय धनवेचा मला फोन आला आणि तुमची गाडी हदगाव-वारंगा पुलाजवळ उभी आहे असे सांगितले. मग मी आणि माझे नातलग जावून ती गाडी घेवून आलो. पण माझा नवरा येथे नव्हता. रात्री 9 वाजता माझे पती जांब गव्हाण येथे असल्याचे मला एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले. तेथे जाऊन मी पतीला घेवून आले. तेंव्हा ते सांगत होते की, माझ्या प्रेम संबंधाबद्दल संजय धनवेला माहित झाले आहे आणि त्याने मला मारहाण केली आहे. पुढे तुझ्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली आहे असे सांगत ते टेन्शन घेत होते.
दि.5 सप्टेंबर रोजी त्यांचे पती सकाळी 5.30 वाजता घरून गेले आणि त्यानंतर त्यांचे प्रेत शेतातील झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडले. त्याबद्दल आकस्मात मृत्यू क्रमांक 46/2024 दाखल आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार संगिता डुकरेचे पती संजय टोपाजी डुकरे यांनी संजय धनवे आणि त्यांची पत्नी प्रेमला संजय धनवे यांच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कार्यवाही व्हावी. आज 2 नोव्हेंबर उजाडला आहे. तरीपण हे गुन्हेगार आखाडा बाळापूर पोलीसांना सापडत नाहीत.
Post Views: 47