नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कार्ला ता.बिलोली येथे दिवाळीच्या अगोदर चार जणांनी मिळून एका 65 वर्षीय महिलेचा खून केला आहे.
संदीप लालु हळदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजता कार्ला येथील त्यांच्या घरासमोर सुनिल चंदर हळदेकर, श्रीकांत चंदर हळदेकर, चंदर संभाजी हळदेकर आणि गंगुबाई चंदर हळदेकर या सर्वांनी मिळून भुखंडाच्या जागेच्या कारणावरून त्यांच्या आईला व भावाला शिवीगाळ करून लोखंडी कुऱ्हाडीच्या सहाय्याने त्यांच्या आई सुखबाई लालु हळदेकर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. तसेच त्यांच्या भावाला गंभीर जखमी केले. बिलोली पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 115, 352 आणि 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 303/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक भोसले हे करीत आहेत.
Post Views: 190