नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिवेणीनगर रस्त्यावर एका महिलेची सोन्याची चैन चोरट्यांनी तोडून नेली आहे. बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्ला (बु) ते बादलगाव रस्त्यावर दोन जणांनी मारहाण करून 17 हजार 200 रुपयांची लुट केली आहे.
अनिता राजू भुसा या महिला 30 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता त्रिवेणीनगर ते नांदेडकडे पायी जात असतांना त्यांच्या गळ्यातील चैन चोरट्याने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली सोन्याची चैन पकडून ठेवली. त्यामुळे काही भाग चोरट्यांकडे गेला आणि काही भाग त्यांच्या हाता शिल्लक राहिला. चोरी गेलेल्या सोन्याच्या चैनची किंमत 45 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 546/2024 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.
शेख हैदर मगदुम साहब हे व्यवसायीक आपली चार चाकी माल वाहतुक करणारी गाडी क्रमांक एम.एच.26 एक्स 6037 घेवून सगरोळी ते कुंडलवाडी जात असतांना बावलगाव रस्त्यावर दोन अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी रोखली. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 17 हजार 200 रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. बिलोली पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 304/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस निरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 81