नांदेड(प्रतिनिधी)-भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. उद्या दि.5 ऑक्टोबर रोजी या संदर्भाने तीन आयएएस अधिकारी आपला अहवाल निवडणुक आयोगाला सादर करतील आणि त्यातून सर्वात वरिष्ठ असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला पोलीस महासंचालकाचा पदभार दिला जाणार आहे. महाविकास आघाडीला आलेले हे यश आहे.
1988 च्या आयपीएस बॅचमध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 मध्ये संपली असतांना महायुती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना बेकायदा मुदतवाढ दिली अशी तक्रार महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी केली होती. रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना त्यांनी संजय राऊत, नाना पटोले अशा अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. असा त्यांच्यावर महाविकास आघाडीची सरकार असतांना आरोप ठेवून त्यांची चौकशी सुरू केली होती. महायुतीने महाविकास आघाडी सरकार पाडले आणि महायुतीने त्यांना पोलीस महासंचालक तर केलेच आणि दोन वर्षाची मुदतवाढ पण दिली. त्यांना मुदवाढ मिळाल्यामुळे अनेक आपीएस अधिकाऱ्यांवर अन्याय झाला.
विधानसभा महाराष्ट्र निवडणुक 2024 जाहीर होताच. महाविकास आघाडीने भारत निवडणुक आयोगाकडे रश्मी शुक्ला यांची तक्रार केली होती. त्यानंतर भारत निवडणुक आयोग हा भारतीय जनता पार्टीचाच आहे अशी समज सध्या देशभर आहे. त्यामुळे काही होणार नाही अशी अपेक्षा होती. परंतू अचानकच भारत निवडणुक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Post Views: 39