नांदेड(प्रतिनिधी)-आखाड्यावरील मुरूम काढून न देण्याच्या कारणावरून भाऊ आणि पुतण्यांनी एका व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार वैजापूर पार्डी गावात घडली आहे. मरणाऱ्याचा एक भाऊ आणि एक पुतण्या बारड पोलीसांच्या ताब्यात आहे.
ऋतुराज बालाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12 वाजेदरम्यान पार्डी वैजापूर ता.मुदखेड येथील त्यांच्या शेताच्या आखाड्यातून त्यांचे वडील बालाजी महाजन पवार (47) हे आपला भाऊ दत्तराम महाजन पवार आणि त्यांचे दोन पुत्र पवन दत्तराम पवार तसेच प्रविण दत्तराम पवार यांना मुरूम काढू देत नव्हते. याचा राग मनात घेवून दत्तराम पवार आणि त्यांच्या दोन पुत्रांनी मिळून बालाजी महाजन पवार यांना कत्तीने मारहाण करून त्यांचा खून केला आहे. बारड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खूनाच्या सदरात गुन्हा क्रमांक 104/2024 दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे हे करीत आहेत. या प्रकरणातील मयताचे बंधू दत्तराम महाजन पवार आणि त्यांचा पूत्र पवन पवार असे दोन मारेकरी पोलीसांच्या ताब्यात आहेत.
Post Views: 168