सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार


नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. या घटनेवर बोलतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, दक्षता या शिवाय दुसरा पर्याय नाही.
मागील दोन दिवसांमध्ये एस.टी.बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधील दागिण्यांचा डबा गायब झाला. सतेच एका पुरूषाकडे असलेल्या थैलीमधील दागिणे गायब झाले. हे सर्व दागिणे जवळपास 6 लाख रुपयांचे आहेत. याबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, या प्रकरणातील महिला तर नांदेडमधील आपल्या घरात चोरी होईल म्हणून आपले दागिणे सोबत घेवून गेली. पण दुर्देवाने तिचे गाव आता काही वेळात येणार आहे अशा परिस्थितीत आपल्या बॅगमधील दागिण्यांचा डब्बा गायब झाल्याची कुणकुण त्यांना लागली. म्हणजे गाडीत प्रवास करतांना सुध्दा दक्षता या शब्दाला पर्यायाच नाही. तरीपण जनतेने आपण प्रवास करतांना आपल्या ओळखीच्या लोकांसोबत बसावे. किंवा सोबत प्रवास करणाऱ्यांची ओळख करून घ्यावी. पुर्णपणे अनोळखी असलेल्या महिला व पुरूषाला आपल्या जवळ बसू देवू नये त्यासाठी एसटीचा वाहक हा मदतगार असतो. त्यापेक्षा आपल्याला गावी जातांना दागिण्यांची गरज नाही अशा परिस्थितीत ते दागिणे तात्पुर्त्या स्वरुपात बॅंकेत ठेवायला हवे. तसेच आपल्या ओळखीच्या, नातलगांच्या घरी ठेवायला हवे जेणे करून प्रवासात होणारे प्रसंग उद्‌भवणार नाहीत.
निवडणुक संदर्भाची तक्रार C-vijal ऍपवर करा
निवडणुकीच्या संदर्भाने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना अबिनाशकुमार म्हणाले C-vijal नावाचे निवडणुक आयोगाचे ऍप आहे. त्यावर आपण कोणतीही तक्रार करू शकता आणि त्या तक्रारीची दखल घेतलीच जाते. एवढेच नव्हे तर तक्रारीत काय निष्पन्न झाले याबद्दलची माहिती सुध्दा निवडणुक आयोगाकडून त्यावर अपलोड होत असते. निवडणुकीच्या संदर्भाच्या तक्रारीसाठी कोणालाही पोलीस किंवा महसुल विभागाकडे जाण्याची गरजच नाही. या ऍपचा उपयोग जनतेनेही करावा आणि निवडणुकीत सहभागी लोकांनी सुध्दा करावा.


Post Views: 10






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *