नांदेड – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला छेद देऊन काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीची प्रचंड वाताहत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सुरुंग लावून जातीपातीचे राजकारण केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाची मारक ही काँग्रेस आहे तर महायुतीने संविधानाची थट्टा लावली आहे . त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा दारू पराभव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचे रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांनी केले.
नांदेड लोकसभा निवडणुकीचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ काल जेतवन मैदान फायर स्टेशन जवळ आंबेडकर नगर नांदेड येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी माधवदादा जमदाडे (प्रदेश सचिव), श्रीपती ढोले (प्रदेश सचिव), प्रतिक मोरे (८६, नांदेड उत्तर विधानसभा उमेदवार),अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), प्रशांत गोडबोल (युवक जिल्हाध्यक्ष, नांदेह दक्षिण), सय्यद इलयाज पाशा (नेते, रिपब्लिकन सेना), रवि हाडसे (युवक जिल्हाध्यबा, नांदेड उत्तर), राहुल चिखलीकर (अध्यक्ष, बहुजन लोकन्याय संघ), संदिप मांजरमकर (मा. जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, नदिड उत्तर), रूपेश सोनसळे (नेते, रिपब्लिकन सेना), संतोषकुमार साळवे (जिल्हाध्यक्ष, कामगार सेना, नांदेड), सिद्धार्थ कांबळे बेळीकर (जिल्हा प्रवक्ता, नांदेड), शंकर थोरात (जिल्हा महासचिव, नांदेड) , अंकुश सावते (विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, नांदेड) , प्रेमिलाताई वाघमारे (भाजी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, नांदेड) आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा. राजू सोनसळे यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीवर जोरदार टीका केली. महायुतीमुळे राज्यात जातीयता वाढली .धर्मांधा वाढली आहे तर संविधानाला छेद देण्याचे कामही महायुतीचे सरकार करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून तुमच्या आमच्या गोरगरीब जनतेचे जगणे महाग करणाऱ्या महायुतीने गरिबीची थट्टा केली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करूनही इथली जातीयेता त्यांना संपविता आली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा सहानुभूती मिळविण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे मात्र आंबेडकरी चळवणीने या दोन्ही आघाड्यांना बाजूला सारून आपला नेता निवडावा . यासाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे . त्यामुळे सिटी निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड विजयी करां असे आवाहनही त्यांनी केले.
Post Views: 37