नांदेड(प्रतिनिधी)- 10 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या अल्पवयीन बालिकेच्या आजीचा प्रियकर असलेल्या एका वकीलाने जवळपास ऑगस्ट 2023 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत सलग 14 महिने त्या अल्पवयीन बालिकेवर अन्याय केला. या अन्यायात बालिकेची आजी आरोपी वकीलाला सक्रीय मदत करत होती.
गंगाखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 2 तासात आरोपींना जेरबंद केले आहे.
तक्रार आल्यानंतर गंगाखेडचे पोलीस निरिक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंगनवाड यांनी हा गुन्हा 709/2024 नुसार दाखल केला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 109, 114, 354(अ), 376, 376(2)(एन), 376(अ), 376(ब), 506, 34 सोबत पोक्सो कायद्याचे कलम 10, 17, 4, 6 आणि 8 जोडण्यात आले आहे. या अल्पवयीन बालिकेला वकील राम गायकवाड अश्लील चित्रपट दाखवायचा आणि तिच्यावर आपल्या प्रेमीकेच्या मदतीने अत्याचार करायचा.
गंगाखेड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शेख असद, बुधोडकर, पोलीस अंमलदार परसराम परचेवाड, राहुल राठोड, श्रीमती जिंकलवाड आदींनी बालिकेवर अत्याचार करणारा वकील आणि त्याला मदत करणारी त्याची 50 वर्षीय प्रेमीका या दोघांना 2 तासातच जेरबंद केले आहे. हा गुन्हा आज सकाळी दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राम गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.