नांदेड(प्रतिनिधी)-पैशाच्या वादातून एका 32 वर्षीय व्यक्तीला चारचाकीने धडक देवून खाली पाडून त्याच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्र्वर विठ्ठल खिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष उत्तम शिंदे (32) याच्यासोबत त्यांचे भाऊ किरण विठ्ठल खिरे (35) यांचे दोन वर्षापुर्वी झालेल्या पैशाच्या व्यवहारातून वाद झाला. तेंव्हा संतोष खिरेने चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.12 एम.4345 ने किरण खिरेला हिंगणी गावापासून 300 मिटर अंतरावर, माहुर तालुक्यात धडक दिली. किरण खिरे खाली पडल्यावर चार चाकी वाहनात असणाऱ्या टॉमीने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. माहुर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 152/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
Post Views: 579