नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक गावठी पिस्टल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे गावठी बंदुक सापडते आहे. समाजाने नक्कीच याचा विचार करण्याची गरज आहे.
सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग व्यंकटराव माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर रोजी नांदेड ते उस्माननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ढाकणी पाटी ता.लोहा येथे एका व्यक्तीकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली आणि त्याला ताब्यात घेतले. तो विधीसंघर्षग्रस्त बालक निघाला. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस असा 40 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सोनखेड पोलीस ठाण्यात विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा क्रमांक 201/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी सोनखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार वामन नागरगोजे, विश्र्वनाथ हंबर्डे, अंगद कदम, सिध्दार्थ वाघमारे आणि देवकत्ते यांचे कौतुक केले आहे.
Post Views: 330