नांदेड(प्रतिनिधी)-बर्की चौक भागात 8 नोव्हेंबर रोजी पोलीसांनी केलेल्या एका तपासणीत एका बंद बॉडीच्या चार चाकी गाडीमध्ये 8 लाख रुपये रोख रक्कम भेटली. 8 लाख रुपये रोख रक्कम आणि 10 लाखांची गाडी असा 18 लाखांचा मुद्देमाल इतवारा पोलीसांनी जप्त केला आहे.
सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर इतवारा पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक विलास पवार आणि इतर पोलीस अंमलदार दुपारी गस्त करत असतांना बर्की चौक परिसरात चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.14 एल.बी.1281 ही या गाडीची तपासणी केली. या गाडीमध्ये 8 लाख रुपये रोख रक्कम होती. याबद्दल संबंधीतांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून पोलीसांनी रोख रक्कम आणि वाहन जप्त करून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जप्त केले आहे.
याबाबत एफएसटी, आयटी आणि इतर संबंधीत विभागांना याबद्दल सुचना देण्यात आली आहे. निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इतर इएसएमएस या पोर्टलमध्ये या जप्तीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुर्ण चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
Post Views: 106