चिखलीकरांना लोकसभेत पाडल, विधानसभेत पाडा, ग्राम पंचायतमध्ये सुध्दा पाडा-उध्दव ठाकरे


लोहा-कंधार मतदार संघात चिखलीकरांनी पाण्या विना केलेला चिखल पसरला आहे
माझ्या शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर तो हात मी जागेवर ठेवणार नाही
नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या शिवसैनिकाच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तर तो हात मी जागेवर ठेवणार नाही, लोहा-कंधारमध्ये पाणी नाही नुसता चिखलीकराचा चिखलच आहे. पाण्याशिवाय चिखल करणाऱ्या या चिखलीकराला उभा राहिल तेथे पाडा असे आवाहन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जनतेला केले.
काल दि.9 नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठाच्यावतीने विधानसभा लोहा मतदार संघातील प्रचार सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार आणि महाविकास आघाडीचे इतर उमेदवार यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना व्यासपीठावर असलेल्या संतोश वडवळेला आपल्या जवळ बोलावून उध्दव ठाकरे म्हणाले माझ्या शिवसैनिकाची बोट तोडणाऱ्याचा हात मी जागेवर ठेवणार नाही. जनतेत अस्वस्थता होईल म्हणून मी आज काही करत नाही. परंतू मी आजही बाळासाहेबांची शिकवण विसरलेलो नाही. ते सांगत होते की, आपण स्वत:हुन कोणावर हात उगारायचा नाही. पण कोणता हात आपल्याविरुध्द उठला तर तो हात गायब सुध्दा करू टाका. चिखलीकराने नावाप्रमाणे लोहा-कंधारचा चिखल करून टाकला. लढायचे असेल तर शुरासारखे लढा आम्ही काही शंड नाहीत हे पोलीसांनी सुध्दा लक्षात ठेवावे. यापुर्वी चिखलीकरांना जनतेने लोकसभा निवडणुकीत पाडले. आता विधानसभेत पाडा, ग्रामपंचायतमध्ये पाडा, सोसायटीच्या निवडणुकीत पाडा यासाठी भरपूर मेहनत पण घ्या असे उध्दव ठाकरे म्हणाले.
याप्रसंगी लोहा-कंधारमधील शेतकरी पक्षा नेते माजी खा.केशवरावा धोंडगे यांच्याबद्दल बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी जेंव्हा गॅलरीत बसून विधानसभेत केशवरावांचे भाषण ऐकायचो तेंव्हा विधानसभेच्या आत टाचणी पडली तरी आवाज येईल ऐवढी शांतता असायची. आजही त्यांचा सन्मान करणे आमची जबाबदारी आहे. जे मिंधे आणि गद्दार माझ्यावर आरोप करतात ते ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस यांच्या सहाय्याने माझ्यासोबत लढायचा प्रयत्न करत आहेत. पण मी आघाडीचा धर्म पाळणार आहे. आघाडीत खेचा-खेची झाली तर हे नतदृष्ट पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसतील आणि पुन्हा बसलेच तर पुर्ण महाराष्ट्र संपवून टाकतील. मोदी शाहने तर महाराष्ट्र लुटण्यासाठीच पुन्हा महाराष्ट्रात जिंकायचे आहे असा प्रयत्न सुरू आहे. ज्या महाराष्ट्राचे अनेक उद्योग यांनी गुजरातमध्ये नेले. त्या महाराष्ट्रात मत मागतांना त्यांना लाज वाटत नाही. बटेंगे तो कटेंगे असे म्हणणाऱ्यांनी विचार करावा कोण कटणार. कापा-कापी करणारी मंडळी तर तुमच्याकडे आहे. माझ्या शिवसैनिक संतोष वडवळेची बोटे त्यांनी कापली. मोदी समोर नेऊन याला उभे करा आणि त्याला दाखवा की, कापाकापी कोण करत आहे.
माझ्या हातात मशाल आहे. मशालच काळोख संपवते. म्हणूनच मी आरएसएसला विचारतो की, 100 वर्षाचे संघटन असलेल्या आरएसएसने का या भारतीय जनता पार्टीला वाढवलात. महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. आमचे सरकार आले तर आम्ही सुध्दा महिलांना 3 हजार रुपये देऊ, युवतींप्रमाणे युवकांना सुध्दा मोफत शिक्षण देवू. महिलांच्या सुविधेसाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या सर्वच महिला असतील अशी पोलीस ठाणे उभारू. संत गाडगे बाबा सांगत होते की, अन्न-वस्त्र-निवारा देणे महत्वाचे आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी आज जनतेच्या न्यायालयात आलो आहे. मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचुड आता सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीचे काम केले. नरेंद्र मोदीने विधानसभेच्या जाहीर सभांची सुरूवात धुळे येथून केली आहे. महाराष्ट्राची जनता आता त्यांना तसेच भारतीय जनता पार्टीला धुळ चारणार आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले, म्हणूनच मला जनता न्याय देईल असा विश्र्वास व्यक्त केला. उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या निशाण्या पंजा, मशाल आणि तुतारी या चिन्हांना मतदान करून आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करा असे सांगितले.


Post Views: 70






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *