महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रंग हळुहळू जोरात वाढत आहे. काल दि.9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा नांदेडमध्ये होती. त्या अगोदर 8 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी धुळे आणि नाशिक या ठिकाणी जाहीर सभा केल्या. या सभांमध्ये विजयांचे आवाहन करतांना नरेंद्र मोदींनी लपवलेल्या गोष्टींबद्दली सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी आमचा हा छोटासा खटाटोप.
धुळेच्या सभेत नरेंद्र मोदींनी धुळे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याचे सांगतांना अनुसूचित जमातीच्या सर्व उप जमातींची नावे घेतली. तसेच नंतर नाशिक येथे ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींची नावे घेतली. नांदेडमध्ये सुध्दा ओबीसींवर भर दिला आणि सांगितले की, या वेगेवगेळ्याप्रवर्गांमधील वेगवेगळ्या जातींमध्ये कॉंगे्रस भांडण लावत आहे. मागच्या दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे. सत्ता ज्यांच्याकडे आहे ते भांडण लावू शकतात. कारण त्यांच्याकडे प्रशासन सुध्दा असते. ज्यांच्याकडे सत्ता नाही, प्रशासन नाही असा कॉंगे्रस पक्ष जातींमध्ये भांडण लावील हे ऐकून हसू येत आहे. भांडण लावण्याचा कारभार नांदेडमध्ये सुध्दा झाला होता. एका शिवसैनिकाची बोटे कापली होती. तो व्यक्ती नरेंद्र मोदींच्या महायुतीमधील आज उमेदवार आहे. भांडणे लावण्याचा धंदा त्यांच्या पेक्षा चांगला कोणी करत नाही.
आजच्या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तोंडाने जरी शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मतदान करा असे सांगत असलात तरी त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभा निवडणुकीत पराभुत व्हावेत यासाठीच तुम्ही फिल्डींग लावलेली आहे. हा राजकीय खेळीचा भाग असू शकतो. पण खलबत तयार करतांना ते आपल्याच घरातील लोकांविरुध्द तुम्ही करत आहात हे सुध्दा सत्य आहे. कारण अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या वाक्यावर आपला मोठा आक्षेप घेतला. खरे तर राजकीय परिस्थितीमध्ये त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तरी पण त्यांनी तुमची सभा आपल्या मतदार संघात नको म्हणून हात जोडले. भरपूर काही आहे यात. आपण त्याला समजून घेत नाही. पण जनतेला सर्व समजते आहे.
मणीपुरमधील मुख्यमंत्री विरेनसिंह हे आपले आणि गृहमंत्री अमित शाह यांचे किती ऐकतात हे लिहावे काय?, आपल्याला ते काय-काय बोलतात ते जाहीर करावे काय?, सर्वोच्च न्यायालयामध्ये तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी मणीपुरमधील सत्य बाहेर मांडले आहे. त्यानंतर सुध्दा तुम्ही आम्हीच सर्व सक्षम आहोत असे म्हणतात हे लिहितांना मणीपूरमधील घटना पुन्हा एकदा लिहुन आम्ही महिलांची बेअबु्र करु इच्छीत नाही. झारखंडमध्ये असलेली खनिज संपत्ती आणि त्या खनिज संपत्तीमधला वाटा तुमच्यापर्यंत पोहचत नव्हता म्हणून तुम्ही हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकले. पण ती खाण कोणी ज्या खाणीसाठी तुम्ही हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकले. ती खाण मात्र आजपर्यंत कोणाला दिसलेली नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कशा निवडुण येतात याचे भरपूर शब्द आपण सांगता. पण सन 2014 मध्ये आपल्याला पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या खासदारकीच्या जागा 2024 मध्ये संपल्या आहेत. याची कारणे काय आहेत. ते का नाही सांगत आपण. असे अनेक सत्य लपवून आपण लाल पुस्तक म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख करता आणि राहुल गांधीवर हा आरोप ठेवता की, लाल पुस्तक दाखवून ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत. खरा अपमान कोण करत आहे हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारा आणि जे मन सांगेल ते जनतेसमोर व्यक्त करा. तरच तुमची सत्यता लोकांना पटेल. राहुल गांधीने कधीच जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा विषय बोललेला नाही. त्यांनी जातीनिहाय जनगणना हवी ही मागणी केलेली आहे. का नाही करत आपण जातीय जनगणाना ज्यांची संख्या जेवढी त्यांना त्या प्रमाणात आरक्षण मिळेल. का हे सुत्र आपल्याला नको. तुम्ही हरियाणाच्या विजयाचा उल्लेख केला. हरीयाणा 90 विधानसभेचे सदस्य सभागृह आहे. महाराष्ट्र 288 चे आहे. का तुलना करत आहात. दोन्ही राज्यांची तुलना होवू शकते काय? तुम्हाला महाराष्ट्रातील सत्ता अडाणीच्या प्रकल्पांना सुव्यवस्थीत ठेवण्यासाठी हवी आहे.
भारतीय राजकारणामध्ये आता बहुराष्ट्रीय कंपन्यांची पकड राजकारणावर झाली आहे. निवडणुक मुद्रांक हा छोटा विषय आहे. त्या पेक्षा जास्त या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मिळत असलेल्या शासकीय सुविधांचा आहे. त्यासाठी तर बहुराष्ट्रीय कंपन्या राजकीय लोकांशी आपले संधान साधत असतात. ज्या ठिकाणी कॉंगे्रस पक्षाची सत्ता आहे. त्या राज्यांची नावे घेवून आपण याच बहुराष्ट्रीय कंपन्यांवर आरोप करता. पण ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्या राज्यात आपण त्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांना मदत करत आहात. म्हणजे आपले ते बाळ इतरांचे ते कारटे हा न्याय जनतेला कळत नाही काय?
जगात तर अमेरिका, कॅनडा, इजरायल, चिन, रशिया, युक्रेन या ठिकाणी आपली परिस्थिती किती छान आहे याचे आकलन करा. आता तर ट्रम्पने अमेरिकेत बाहेरचा कोणी येणारच नाही अशी भुमिका निवडुण येताच जाहीर केली आहे. दरवर्षी हजारो गुजराती छुप्या पध्दतीने अमेरिकेत प्रवास करतांना मरण पावतात. याचा अभिलेख आहे. हा अभिलेख लोकांना माहित नसेल का? ज्या-ज्या लोकांनी घोटाळे केले आहेत. त्यातील बहुतांश मंडळी गुजरातची आहे. तरी पण गुजरात मॉडेल म्हणून स्वत:चे नाव गाजविण्याचा आपला खोटारडा प्रयत्न महाराष्ट्राची जनता नक्कीच हाणून पाडेल.
Post Views: 26