एका ओबीसी मतदाराने वास्तव न्युज लाईव्हला पाठविलेला हा संदेश आम्ही जशाचा तसा वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत.
एकीकडे ओबीसी चे मते घ्यायची आणि दुसरीकडे त्याच मतांच्या जोरावर त्यांच्या जीवावर उठायच हे पाप विद्यमान आमदार आणि कॉंगे्रसचे उमेदवार माधव पाटील जवळगावकर यांनी केला आहे. जवळगावकर हे जातीने मराठा असले तरी जातीसाठी माती खावी ही म्हण खरी आहे. पण आमदार होण्यासाठी त्यांना एका जातीने मतदान टाकलं नाही सर्व जातींचा विचार करून त्यांनी आपली भूमिका घेणे अपेक्षित होते. पण तस न करता उघडपणे मराठा आंदोलनात सहभाग घेऊन हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील ओबीसी, दलित, आदिवासी मतदारांचा घोर अपमान केला. अशा या जातीयवादी आमदार जवळगावकरांना ओबीसी बांधवांनी मतदान टाकू नये. जवळगावकरांनी निवडून येण्यासाठी आता मराठ्यांचे उंबरठे झिजवावे. आमच्या मतावर मोठ व्हायच आणि जातीसाठी काम करायच आता आम्ही कदापिही सहन करणार नाही. ओबीसीच्या आरक्षणासाठी एकही शब्द काढला नाही. मत मागण्यासाठी ओबीसीच्या दारात आपण यायच नाही हा निर्णय आता सर्व ओबीसी बांधवांनी एक मुखाने घेतला आहे. ओबीसी बांधवांनो आताच सावध व्हा अन्यथा येणाऱ्या काळात जातीयवादी मराठे आपल्याला त्यांच्या कायमच दावणीला बांधून ठेवतील. यासाठी ओबीसी मतदारांनी उघड भूमिका घेऊन. जवळगावकरांच्या विरोधात हदगाव हिमायतनगरमध्ये प्रचार करावा आणि ओबीसी बांधवांची बाजू घेणारे उमेदवार विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करावे.
-एक ओबीसी मतदार.
Post Views: 220