गुरूवारी खा.राहुल गांधी यांची नवा मोंढा मैदानात जाहीर सभा


हिम्मत असेल तर नरेंद्र मोदींनी जातनिहाय जणगणनेचा विरोध जाहीर करावा-शब्बीरअली

Oplus_0

नांदेड(प्रतिनिधी)-जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंगे्रसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले.
उद्या पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि.14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शब्बीरअली बोलत होते. त्यांच्यासोबत तेलंगणातील जहीराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेशकुमार शेटकार, अखील भारतीय कॉंगे्रस कमिटीच्या सचिव झरीता, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, प्रदेश सचिव ऍड.घोडजकर, एकनाथ मोरे, बापु पाटील आणि मुन्तजिब यांची उपस्थितीत होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना शब्बीरअली म्हणाले की, उगीचच कॉंगे्रसचे नाव बदनाम करत नरेंद्र मोदी जाती-पातींच्या विषयी बोलत असतात. यापुर्वी बिहार राज्यात जातनिहाय जनगणना झाली आहे. सध्या तेलंगणा राज्यात सुध्दा जात निहाय जनगणना सुरू आहे. काय झाले बिहारमध्ये आणि काय होणार आहे तेलंगणामध्ये आणि काय होईल देशात असे अनेक प्रश्न उपस्थित करत निवडणुकीच्या कालखंडात नरेंद्र मोदी यांना जात आठवते. जी भारतीय संविधानाने कधीच सांगितलेली नाही. हिम्मत असेल तर त्यांनी असे जाहीर करावे की, मला जातनिहाय जनगणना मंजुर नाही. आपसात विद्वेष होईल अशी नारे बाजी करून निवडणुक जिंकता येत नसते. निवडणुक जिंकण्यासाठी विकासाच्या मुद्यांची आवश्यकता असते. तेलंगणा राज्यात एकाच परिसरात विविध जात धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्रीत ठेवून त्यांना शिक्षण देण्याची एक योजना आखली आहे. त्यावर काम सुरू आहे. असे काही देशासाठी नरेंद्र मोदींनी विचार करावा आणि मते मागावी.
तेलंगणा राज्य तयार झाले तेंव्हा राज्याचा खजीना हा जमा स्वरुपात होता. यावर बोलतांनाा शब्बीर अली म्हणाले की, राज्य चालविण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. सध्या बीआरएसकडून आम्ही सत्ता खेचून आणली तेंव्हा आमच्यासमोर 17 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण आम्ही अत्यंत सुनियोजितपणे त्या कर्जाची परतफेड करू, जनतेच्या कल्याणाची कामे करू आणि विकासांच्या योजनांवर भर देवू.
नांदेड जिल्ह्यात उद्या नांदेड शहरात नवा मोंढा मैदानात भारताचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की, या सभांना उपस्थित राहुन आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात आणि विकासाची गंगा आपल्या मतदार संघामध्ये आणण्यासाठी कॉंगे्रस आणि त्यांच्या महाविकास आघाडीला मतदान करून जनतेने विजयी करावे असे शब्बीर अली यांनी सांगितले.


Post Views: 28






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *