मतदान संपताच प्रत्येक विधानसभेतील उमेदवाराने प्रत्येक मतदान केंद्रातून नमुना क्रमांक 17 घ्यावाच..


नांदेड-विधानसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या उमेदवारांना वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने प्रत्येक मतदान केंद्रावरचा नमुना क्रमांक 17 हस्तगत करा हे सांगण्यासाठीच ही शब्दसंरचना केली आहे.
ज्यावेळेस पासून भारताच्या निवडणुक प्रक्रियेत ईव्हीएम आले. तेंव्हापासून त्या ईव्हीएमवर अनेकदा आक्षेप उचलण्यात आले. पण कोणत्याही आक्षेपाला निवडणुक आयोगाने कधीच मान्यता दिली नाही. किंबहुना त्याची चौकशी सुध्दा केली नाही असो. या ईव्हीएमवरील चर्चांवर अनेकदा विश्लेषकांनी चर्चा केल्या.त्यावरील आक्षेपांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका सुध्दा दाखल झाल्या. पण त्यातून निर्णय काही आला नाही.
या सर्व प्रक्रियेवर केरळचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी जालीम उपाय काढला. त्यांनी आपल्या उमेदवारांना हे समजून सांगितले की, ज्या मतदान केंद्रात निवडणुक मतदान पुर्ण झाले. तेथील उमेदवारांच्या प्रतिनिधीने तेथील निवडणुक अधिकाऱ्यांकडून नमुना क्रमांक 17 भरून घेतला पाहिजे. ज्या नमुन्यावर विधानसभा मतदार संघ क्रमांक, विधानसभा मतदार संघाचे नाव, त्या मतदान केंद्रावर एकूण असलेले मतदान आणि आज झालेले मतदान हे सर्व आकडे विहित असतात. सोबतच त्या ईव्हीएम मशीनचे क्रमांक नोंदवलेले असतात.
लोकसभा निवडणुक, हरीयाणा विधानसभा निवडणुक यामध्ये निवडणुक आयोगाने जाहीर केलेलेल्या आकडेवारीमध्ये अनेकदा बदल केलेले आहेत. ज्यामध्ये एका विधानसभा मतदार संघाचा तो डाटा आहे. मतदान केंद्राप्रमाणे तो डाटा नाही. त्यामध्ये निवडणुक आयोगाने मतदानाच्या दिवशी एक आकडेवारी, दुसऱ्या दिवशी नवीन आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी किंवा रात्री तिसरी आकडेवारी अशा पध्दतीने झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली. ज्यामुळे झालेले मतदान वाढले. पण प्रत्यक्षात काय झाले होते हे कोणालाच सांगता आहे नाही. कारण कोणत्याही राजकीय पक्षाने मतदान केंद्रावरून नमुना क्रमांक 17 भरून घेतलेला नाही. निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी मशीनचा खेळ करते हा आरोप आहे. पण त्या आरोपाला सक्षम पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्याचे निर्णय आले नाहीत.
केरळचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ज्या प्रमाणे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रातून नमुना क्रमांक 17 उपलब्ध करून घेतला होता. त्यामुळे केरळ विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढवून आलेली नाही. अशाच पध्दतीची प्रक्रिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने, विशेष करून विरोधी पक्षांनी, अपक्षांनी हा नमुना क्रमांक 17 मतदान संपल्यावर लगेच भरून घेतला तर ईव्हीएमवरील आक्षेप त्यांना घ्यायची गरज पडणार नाही आणि जे व्यक्ती या ईव्हीएममध्ये गडबड करतात त्यांना ती करता येणार नाही. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने आप-आपल्या उमेदवारांना हे नमुना क्रमंाक 17 जमा करून त्यातील आकडेवारी मोजून केंद्रीय समितीकडे देण्यास बंधनकारक करावे ही विनंती करण्यासाठीच आमची मेहनत आहे.


Post Views: 9






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *