नांदेड(प्रतिनिधी)-10 नोव्हेंबर रोजी घरफोडी करून 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरणाऱ्या व्यक्तीला कुंडलवाडी पोलीसांनी अटक करुन त्याकडून संपुर्ण चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
दि.10 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीबाई नागनाथ सुरकुटलावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेसकुंडलवाडी येथील त्यांच्या घराच्या पाठीमागच्या दाराची कडी उचकटून आणि साहित्याची उलथापालथ करून घरातील लोखंडी संदुकात ठेवलेले कानातील सोन्याचे फुल, सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे डोरले, सोन्याचे सहा पान, सोन्याचे 60 मनी आणि चांदीची साखळी असा एकूण 1 लाख 5 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. या संदर्भाने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 186/2024 दाखल होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी केलेली पाहणी आणि दिलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर पोलीसांनी बेसकुंडलवाडी येथे राहणाऱ्या दिगंबर राम जानोळे(30) या व्यक्तीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचे सर्व साहित्य जप्त केले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनात कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.टी. नागरगोजे, पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे, पोलीस अंमलदार एस.एल. चव्हाण, आर.एस.देशमुख यांनी ही कार्यवाही केली त्याबद्दली त्यांचे कौतुक होत आहे.
Post Views: 143