नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात आला आहे.या दरम्यान हिंदुस्थान लाईव्ह या युट्युब चॅनलने देवेंद्र फडणवीस यांचे असद्दोदीन ओवेसीबद्दलचे उद्गार आणि ओवेसी यांनी दिलेल्या उत्तर व्हिडीओ माध्यमातून प्रसारीत केले आहे. ओवेसी सांगत होते की, ईतिहासात तु कमजोर आहेस आणि माझ्या शब्दांसोबत खेळण्याचा प्रयत्न करू नका तु अमित शाह आणि मोडी तिघेही एकदा उत्तरले तर मला बोलण्याच्या ताकतीत तुम्ही कमीच पडणार आहात. यावरून विधानसभा निवडणुकीचा प्रचार किती खालच्या थराला चालला आहे याचा प्रत्यय येतो.
विधानसभा निवडणुकीदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ओवेसी महाराष्ट्रात आला आहे आणि येथे येवून औरंगजेबांचे महिमा मंडन सुरू आहे आणि आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. कुत्ता भी पेशाब ना करे औरंगजेब की पहेचानपर अब तो तिरंगा लहेरायेंगे पुरे पाकिस्तानपर. ओवेसी महाराष्ट्रात येत आहे याबद्दल हैद्राबादी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या हैद्राबादी बंधू तु इकडे येवू नकोस तुझे येथे काही काम नाही. भारताचा खरा मुस्लमान सुध्दा औरंगजेबला आपला हिरो मानत नाही.
या शब्दांना उत्तर देतांना ओवेसीने सुरूवात करतांना तुम्ही कोठे असाल तर तुमच्या तोंडावर दुल्हेभाई(भावजी)चे नाव आले याचा मला आनंद आहे. ओवेसी म्हणाले ए देवेंद्र फडणवीस तु माझ्या शब्दांसोबत, माझ्या बोलण्यासोबत बरोबरी करू शकत नाहीस. तुच नाही तर अमित शाह आणि मोडी तुझ्या सोबत बसले तरी तुम्ही तिघे माझ्या जिभेची बरोबरी करू शकत नाही. ओवीसीच्या मते मी महाराष्ट्राच्या निवडणुक आयुक्तांना विचारू शकतो की ज्या भाषेत देवेंद्र फडणवीस बोलतात ती निवडणुक आचार संहिता आहे काय? माझे नाव घेवून जिहाद(धर्म युध्द) चे नाव घेतले जात आहे. हे कायद्याच्या कक्षेत येते काय? ही लोकशाही आहे यामध्ये धर्मयुध्द आणि जिहाद कुठून आला. पण आता मी बोलेल तेंव्हा तुला नक्कीच खाज होईल.
तुम्ही अनेक आमदार खरेदी केली, चोरी केली अशा परिस्थितीत तुम्हाला काय म्हणावे, चोर म्हणावे काय?, ड्रक फारचा प्रकल्प 3 हजार कोटी रुपयांचा, टाटा एअर बसचा प्रकल्प 17 हजार कोटी रुपयांचा, वेदांताचा प्रकल्प 1लाख 55 हजार रुपयांचा, मेडिकलचा प्रकल्प 4 हजार कोटी रुपयांचा हे सर्व प्रकल्प 1 लाख 80 हजार कोटीचे प्रकल्प का गेले तुझ्यात हिम्मत नव्हती काय? तुमच्या पप्पाजींला भिलात काय?. ते फडणवीस आहेत म्हणून त्यांना वाटते की लोकांनी त्यांना भ्यावे, लोकांनी त्यांच्या पायाजवळ बसावे, माझे नाव घेवून धर्म युध्द सांगावे पण, ते फडणवीस आहेत म्हणून त्यांना वाटते की, मी ओवेसीला खाली पाडेल, तुम्ही ज्या गोष्टीला औरंगाबादमध्ये आणू इच्छीता ती गोष्ट कधीच औरंगाबादमध्ये येवू शकत नाही. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर बनवलेल्या संविधानात फडणवीस बी बरोबर आणि ओवेसी बी बरोबर आहे. हे सर्व बोलत असतांना,” तुम्हारी जबान पर दुल्हेभाई का नाम तो आ गया ना’, तुमच्या तोंडून जरांगे पाटीलचे नाव निघेल काय? हिम्मत असेल तर काढून दाखवा, तुमच्या जिभेला जरांगे पाटीलचे नाव घेतांना लकवा येईल. एकदा जरांगे पाटील बोलून तर दाखवा पण ते बोलणार नाही. पण मी बोलू शकतो ओ मेरे भाईजान है तो मे बोलूंगा, भाईजान कोणाला म्हणतात असा प्रश्न ओवीसी यांनी जनतेला विचारला.
देवेंद्र फडणवीस वेळोवेळी जिहाद-जिहाद असे म्हणतात. पण खरे तर इंग्रजांच्या काळात तुमचा हिरो जेलमध्ये बसून इंग्रजांना लव्ह लेटर लिहित होता. त्यावेळी उलमाए इकराम हुसेन मदनी, मौलाना महेमुदउल हसन इंग्रजांसमोर झुकले नाहीत. ही सर्व माझे पुर्वज आहेत ज्यांनी काळापाणी जेलमध्ये इंग्रजांच्या समोर छाती ठोकली होती. माझ्या पुर्वजांनी इंग्रजांसोबत कोणताही सौदा केला नाही. 1820 मध्ये मदरशांनी फत्तवा काढला होता. जो इंग्रजांना देशातून हाकलून लावायचा होता. त्यालाच जिहादचा फत्तवा असे म्हणतात. इंग्रजांशी लढण्याचे कसब आम्ही देशाला शिकवले आहे. ईतिहास साक्षी आहे की, दिल्लीच्या जामा मजिदपासून ते पाकिस्तानच्या सिमेपर्यंत असलेल्या झाडांवर माझ्या पुर्वजांचे शव लटकलेले होते. त्यातूनच आम्ही शिकलो की देश आमचा आहे आणि देशासाठी आम्हा बलिदान द्यावे लागते.
फडणवीस सांगतात वोट जिहाद पहिले लॅन्ड जिहाद झाला, लव्ह जिहाद झाला आणि वोट जिहाद तुम्हाला ज्या ठिकाणी विजय मिळाला नाही त्या ठिकाणी जिहाद झाला. मालेगाव सेंट्रलची जागा तुम्ही जिंकली नाही म्हणून जिहाद झाला. मला हरवू शकले नाही म्हणून जिहाद झाला.तुम्ही आयोध्या हारलात मला हे सांगा की तुम्ही या सर्व जागा का हारलात. 1818 मध्ये मालेगावमध्ये इंग्रज आणि मराठे यांच्या तिसरी लढाई झाली होती.या लढाईमध्ये मराठा सेनेत अनंत मुस्लीम होते. तुम्ही ईतिहासात ढ आहात फडणवीस, तुम्हाला ईतिहास माहित नाही. मुस्लीम मालेगाव किल्यावर उभे राहिले, इंग्रजांशी लढले, त्या लढाईत 30 जवान शहीद झाले होते. 36 तोफे वापरली होती. 8 हजार पेक्षा जास्त बॉम्ब इंग्रजांवर टाकले होते. 35 हजार 500 गन पावडर वापरले. ज्या मुस्लिमांनी मालेगावच्या किल्यात मराठा सेनेसोबत उभे राहुन इंग्रजांशी मुकाबला केला. ते सर्व तुमचे पर्वज नव्हते तर ते माझे पुर्वज आहेत. 1921 मध्ये खिलाफत मुमेंट तयार करून हे मुस्लमान मालेगाच्या किल्यावर चढले आणि इंग्रजांचा झेंडा काढला. तो झेंंडा माझ्या पुर्वजांनी काढला. तुमच्या हिरोने नाही काढला. त्यानंतर इंग्रजांनी काही क्रांतीकाऱ्यांना मृत्यूदंड दिले. त्या शहिद होणाऱ्या लोकांमध्ये तुमचा कोणी होता काय ते सर्व ओवेसीचे बाप होते. ते शहीद सुलमान शाह, ईस्माईल अत्तार अका, शाहीन भिकारी, शाबान भिकारी, बुदु, अब्दुल गफार या सर्व शहीदांना इंग्रजांनी फाशी दिली. तुमचा हिरो तर आय लव्ह युचे लेटर लिहत होता.
ओवेसीने फडणवीस यांना दिलेले उत्तर अत्यंत अभ्यासपुर्ण वाटते. त्यावेळी फडणवीसांनी एकही ऐतिहास उच्चारण केले नाही. पण ओवेसी यांनी केलेला ईतिहासाचा अभ्यास नक्कीच वाखाणन्यासारखा आहे. वाचकांच्या सोयीसाठी हिंदुस्थान या युट्युब चॅनलने प्रसारीत केलेलेे दोघांच्या भाषणांची लिंक आम्ही बातमीसोबत जोडली आहे.
Post Views: 39