नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या हातातील संविधानाचे पुस्तक कोरे नसून त्यात भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, डॉ.बाबसाहेब आंबेडकर, फुले, गांधी, नारायण गुरूजी आणि भारतीय जनतेचा आत्मा यात वसतो आहे. विचारांच्या अथांग समुद्राने भरलेली ही पुस्तक सर्वात पवित्र आहे. घृणा आणि हिंसाचार या पुस्तकात लिहिलेलाच नाही असे प्रतिपादन कॉंगे्रस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी केले.
आज नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी नांदेडमध्ये आले होते. व्यासपीठावर कॉंगे्रस पक्षाचे नेते रमेश चेनिथला, सचिन पायलट, पी.श्रीनिवास रेड्डी, उत्तम रेड्डी यांच्यासह नांदेडचे बी.आर.कदम, सुर्यकांता पाटील, डॉ.माधवराव किन्हाळकर, हनमंत बेटमोगरेकर यांच्यासह अनेकाचंी उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीत नांदेडला भाषण करतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की, राहुल गांधी यांच्या हातात असतेती लाल पुस्तक कोरी असते आणि हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे असे सांगितले होते, त्याचे जोरदारपणे उत्तर देतांना खा.राहुल गांधी यांनी ती पुस्तक प्रेषकांना दाखवली की, तु पुर्णपणे लिहिलेली आहे. तसेच या पुस्तकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, नारायण गुरुजी यांच्या विचारांनी भरलेली आहे. माझ्या हातातील पुस्तक ही सर्वात पवित्र पुस्तक आहे. नरेंद्र मोदी यांनी ही पुस्तक एकदा जरी वाचली असती तर आज ते करतात ती कामे त्यांनी कधीच केली नसती. आपण सर्व जण मिळून या पुस्तकाची रक्षा करतो आहोत. या पुस्तकात भारतीय जनतेचा आत्मा आहे. आरएसएस आणि बीजेपी छुप्या पध्दतीने, बंद रुममध्ये ही पुस्तक नष्ट करण्याची खलबते रचतात. त्यांना समोर बोलण्याची ताकत नाही कारण पुस्तकाबद्दल जनतेसमोर बोलले तर देशाची जनता त्यांना खाऊन टाकेल.
महाराष्ट्रातील कोट्यावधीचे प्रकल्प जे लाखो युवकांना रोजगार देणारे होते. ते प्रकल्प गुजरातला कसे गेले हे सांगत असतांना महाराष्ट्रात सरकार चालते काय? हा प्रश्न उपस्थित केला. जागो-जागी घृणा आणि हिंसा याचा उल्लेख करत भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात याचे विश्लेषण करतांना राहुल गांधी म्हणाले मागच्या दीड वर्षापासून मणीपुर जळत आहे. दोन समाजात चाललेल्या भांडणांना शांत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान कधीच तेथे गेले नाहीत. मणीपुरमध्ये घडलेल्या घटनांची नुसती आठवण आली तरी अंगावर काटे येतात.
आपले सरकार आले तर महिलांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 3 हजार रुपये बॅंक खात्यात पाठवू, मोफत बस प्रवास देऊ, शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करू. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव देवू असे सांगितले.महाराष्ट्रासह भारताच्या प्रत्येक नागरीकाला आपल्या आजारांसाठी 25 लाखांचा विमा देवू. बेरोजगार युवकांना 4 हजार रुपये दरमहा भत्ता देवू, आमचे सरकार हे गरीबांचे सरकार आहे, अंबानी, अडाणींचे नाही असे सांगितले. नोटबंदी आणि जीएसटी आणून केंद्र शासनाने छोट्या व्यापाऱ्यांना मारु टाकण्याचे काम केले आहे. भारतात जातीय जनगणना का आवश्यक आहे. ती का आहे याचे स्पष्टीकरण करतांना त्यांनी सांगितले की, भारताचे बजेट 90 आयएएस अधिकारी बनवतात. त्यात एक अनुसूचित जातीचा आणि 15 ओबीसी आहेत. त्या मानाने त्या सर्वांच्या हातात त्यांच्या जाती प्रमाणे जेवढा हक्क हवा होता तो मिळाला नाही. अनुसूचित जातीचा अधिकारी 100 रुपयांपैकी 1 रुपया वाटू शकतो. ओबीसींचे अधिकारी 3 रुपये वाटू शकतात एकूण जातीय जनगणनेच्या आधारे ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची हिस्सेदारी हा भाव मिळत नाहीत. हे 90 अधिकारी 100 रुपयांपैकी 6 रुपये 10 पैसे वाटु शकतात. या सर्व घटनेचा सविस्तर उल्लेख करुन राहुल गांधी यांनी जातीय जनगणना कशी आवश्यक आहे असे सांगितले.
माझ्या हातात असलेल्या लाल पुस्तकातुन नरेंद्र मोदीने 25 लोकांचे माफ केलेले 16 लाख कोटी रुपये कर्ज लिहिलेले नाही. पण या पुस्तकात आपण सर्व एक आहोत हे लिहिलेले आहे. आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी कर्ज माफ केले हे या पुस्तकात लिहिलेले आहे. आपल्या डोळ्यासमोर सर्व काही चालले आहे. पण तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत आहात याचे मला दु:ख वाटते.
राहुल गांधीची बसस्थानकात अचानक भेट
राहुल गांधी यांची सभा संपल्यानंतर त्यांनी बसस्थानकात जाण्याची इच्छा जाहीर केली. डॉ.अण्णाभाऊ साठे चौक ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्या ऐवजी राहुल गांधी यांचा ताफा हिंगोली ओव्हरब्रिजवरुन खाली आला आणि उजवीकडे वळून दवाखान्याच्या मागील गेटपासून रेल्वेस्थानकाकडे आणि पुढे बसस्थानकात गेला. राहुल गांधी यांना या प्रवासामुळे रेल्वे स्थानक ते बस स्थानक हा रस्ता कसा आहे याचा अनुभव आला. बसस्थानकात गाडीतून उतरताच राहुल गांधी बसस्थानकात गेले. लोकांनी त्यांना पाहीले आणि बसस्थानकातील लोकांची धावपळ झाली. त्यानंतर राहुल गांधी अनेक बसमध्ये चढले. प्रवाशांशी बोलले आणि त्यानंतर त्यांनी बसस्थानकात असलेल्या छोट-छोट्या चहा दुकानांवर भेट दिली. तेथे ते बरेच वेळ बसलेले होते. खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बस मध्ये प्रवास करायचा होता. पण सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचा विचार बदलला. चहाच्या दुकानावर बसून अनेक लोकांशी चर्चा केली आणि त्यानंतर ते आपल्या पुढील गंतव्याकडे रवाना झाले. पोलीसांची यामुळे मोठी धावपळ झाली. तरीपण पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव , सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्या नेतृत्वात पोलीसांनी या परिस्थितीला उत्कृष्टपणे हाताळले.
Post Views: 27