नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेच्यावतीने 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 16-नंादेड लोकसभा पोट निवडणुकीतील रिपब्लिकन सेना व मित्र पक्ष पुरस्कृत उमेदवार प्रा.राजूू मधुकरराव सोनसळे यांनी 5 निर्धार सभा आणि एक पदयात्रा आयोजित केली आहे. ज्यामध्ये प्रमुख आकर्षण राजरत्न आंबेडकर असणार आहेत.
लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिट्टी ही निशाणी घेवून निवडणुक मैदानात उतरलेले प्रा.राजू मधुकरराव सोनसळे यांनी 4 निर्धार सभांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये पहिली सभा 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भिमघाट बुध्द विहार परिसरात होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी श्रावस्तीनगर ऍटो स्टॉपजवळ सायंकाळी 6 वाजता सभेचे आयोजन केले आहे. 16 नोव्हेंबर रोजी सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरनगरी स्टेडीयम परिसर गोकुळनगर येथे 6 वाजता आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जय भिमनगर बुध्द विहार परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता डॉ.आंबेडकरनगर येथील त्रिरत्न विहार परिसरात निर्धार सभेचे आयोजन होणार आहे. दि.18 नोव्हेंब रोजी दुपारी 12 वाजता महात्मा फुले परिसरातून पदयात्रा काढली जाणार आहे.
Post Views: 47