नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन जणांना अटक केली आहे आणि चोरीला गेलेले सोन्याचे संपुर्ण गंठण जप्त केले आहे.
रंजना अंकुश शिंदे या मगनपुरा भागात राहतात. महादेवाचे दर्शन करून परत आपल्या घराकडे जात असतांना 10 नोव्हेंबर रोजी त्यांचे 12.800 ग्रॅम सोन्याचे 80 हजार 800 रुपये किंमतीचे गंठण दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून बळजबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 558/2024 दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना शिवाजीनगर भागातील गुन्हे शोध पथकाने 24 तासात अमन किशोर जोगदंड(21) रा.विष्णुनगर नांदेड आणि त्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 4 वरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले 80 हजार 800 रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण आणि 40 हजार रुपये किंमतीची गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी असा 1 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी या उत्कृष्ट कार्यवाहीसाठी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे, पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे, पोलीस अंमलदार अनिल झांबरे, शेख अझरोद्दीन, लिंबाजी राठोड, देवसिंह सिंगल, सरबजितसिंघ पुसरी, मिथुन पवार, दत्ता वडजे आणि सायबर सेलचे राजू सिटीकर यांचे कौतुक केले आहे.
Post Views: 96