नांदेड-महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक प्रकिया सुरू आहे. आजपासून मोजल्यानंतर पाच दिवस मतदानाला शिल्लक आहेत. परंतू निवडणुकीचा प्रचार वेगवेेगळ्या माध्यमातून शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील भावना अशी आहे की, “मोहब्बत भाईचारे के ओ सुहाने दिन लोटा दो, सस्ती दाल, सब्जी, तेल के पुराने दिन लोटा दो. अच्छे दिन अंबानी अडाणी को मुबारक हो हमारे लिऐ तो पुराने दिन लोटा दो’ या पध्दतीत राज्याच्या प्रत्येक मतदाराने येत्या पाच दिवसामध्ये आपण कोणाला आपले अमुल्य मत द्यायचे आहे याचा विचार करा आणि योग्य व्यक्ती निवडुण द्या एवढ्याचसाठी वास्तव न्युज लाईव्हचे प्रयत्न.
आज राज्याच्या प्रत्येक गावात चहाच्या टपरीवर, बस स्टॅन्ड, रेल्वे प्रवास, आठवडी बाजार, गावातील कट्टे, गावातील पार, गावातील गल्या या ठिकाणी निवडणुकीशिवाय दुसरी चर्चा नाही. व्हायला पण हवी होती. चर्चा होते तेंव्हा त्यातून मार्ग सापडतात. आम्हाला असे जरुर म्हणायचे आहे की, चर्चा जरुर करा पण त्या चर्चेचे स्वरुप वादात बदलू नका. कारण चर्चा वादात बदलली तर त्यातून परिणाम भयंकर होत असतात. निवडणुका संपल्यानंतर पुढील पाच वर्षात कोणालाच कोणी विचारत नाही. परंतू वादाच्या नंतर आलेल्या परिणामांची जबाबदारी मात्र व्यक्तीनिहाय येत असते. त्यात कोणताही राजकीय पक्ष हातभार लावत नाही.
सन 2023 मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक जुना मुडदा उखडून काढतांना संसदेमध्ये सांगितले होते की, यवतमाळ जिल्ह्यातील जालका या गावी सन 2009 मध्ये राहुल गांधी हे कलावती यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी ते जेवले पण त्या महिलेला घर, पाणी, नळ, विद्युत, शौचालय या सुविधा मोदी सरकारने दिल्या आणि त्यावेळी बहुसंख्येत असलेल्या भाजप खासदारांनी बाके वाजवून त्याला समर्थन दिले होते. या संदर्भाने कलावती यांनी ललन टॉप या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सन 2005 मध्ये माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. आमच्याकडे 10 एकर जमीन होती. 7 मुले आणि 2 मुले असा मोठा परिवार होता. त्यावर्षी पिक उत्पादन कमी झाल्याने आणि दीड लाखांचे कर्ज असल्याने चिंताच होती. दोन मुलींचे लग्न झाले होते, दोनचे त्यावर्षी करायचे होते. परंतू या चिंतेत माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर सन 2009 मध्ये राहुल गांधी माझ्या घरी आले. माझ्याशी चर्चा केली. माझ्या दुखावरून हात फिरवला आणि उपस्थितीत अधिकाऱ्यांना सांगितले की यांची मदत झाली पाहिजे. तेंव्हा सुलभ इंटरनॅशनलने 15 दिवसात माझी मदत केली.3 लाखांची रोख रक्कम मला दिली आणि 30 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केले. हा सर्व प्रकार 2012 च्या अगोदरच झाला. अमित शाहबद्दल बोलतांना कलावती सांगत होत्या. मला मोदी सरकारने एकाआण्याची मदत केली नाही. कारण त्यांची सरकार येण्याअगोदरच माझी मदत राहुल गांधी यांनी केली होती. अमित शाह संसदेत बोलले की, मी कलावतीला फोनवर बोललो आहे. याही बाबीला कलावतींनी नाकारले आहे. यावरून खोटारडेपणा किती असतो हे दिसते. मग अशा खोट्या बाबींच्या भुलीत अडकून जनतेने राज्याचे नुकसान करू नये असे वास्तव न्युज लाईव्हला वाटते.
आजच्या परिस्थितीत सर्वात मोठी चर्चा जातीय जनगणनेची आहे. याबद्दल बोलतांना कन्हैयाकुमार म्हणाले आपल्या घरात दहा माणसे असतील तर आपण दहाच लोकांचे जेवण तयार करतो. त्यातील चार माणसे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले असतील तर त्या दिवशी सहाच लोकांचे जेवण बनविले जाते. यामध्ये काय चुक आहे. हीच पध्दत जातीय जनगणनेत तयार होणार आहे. जेवढे लोक आहेत. त्या पध्दतीने त्यांचा हिस्सा वाटप केला जाणार आहे. म्हणजेच जातीय जनगणना कशी आवश्यक आहे हे कन्हैयाकुमारने अत्यंत साध्या भाषेत सांगितले. मागील दहा वर्षात सिलेंडरचा दर आपण दुप्पट देत आहोत. कोणी आम्हाला महागाई बद्दल बोलतांना मी फक्त एकच उदाहरण सांगितले आहे. यावरुन महागाई बद्दल तुम्ही विचार करा आणि आपले मत कोणाला द्यायचे हे ठरवा. ही निवडणुक धर्म युध्द आहे असा प्रचार केला जात आहे. तर कन्हैयाकुमार म्हणाले धर्म युध्द लढण्यासाठी आम्ही सुध्दा तयार आहोत. पण आमची अट आहे की, तुमच्या डीएनएची मुले आमच्या समोर असली पाहिजे. आम्ही त्यांच्या मागे राहुल हे मताचे धर्म युध्द लढण्यासाठी तयार आहोत असे चालणार नाही की, धर्म युध्द आम्ही लढायचे आणि तुमच्या घरच्या महिलांनी इंस्टाग्रामवर रिल तयार करायच्या, तुमची मुले ऑक्सफर्ड युनिव्हसिटीत शिकतील आणि आम्ही रस्त्यावर उतरून धर्म युध्द लढायचे. कन्हैयाकुमार यांनी नागपूरकरांना सांगितले की, ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आपल्यासमोर बोलण्याची ताकत ठेवतो आहे. त्या भुमिमध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे. आपल्या भाषणाची सुरूवात करतांना कन्हैयाकुमारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी सुरूवात केली. घोषणा संपल्यावर म्हणाले की, मला एवढेच मराठी येते. तुम्ही ज्या भुमित जन्मला आहात. त्यात यंदा रेकॉर्ड घडवा. राज्याचे उपमुख्यमंत्री याच मतदारा संघातून निवडणुक लढत आहेत. ज्या मतदार संघात दीक्षाभुमी स्थित आहे. तुमच्या पैशांवर माझे शिक्षण पुर्ण झाले आहे. तो अधिकार मला या संविधानाने दिलेला आहे. म्हणून मला नागपुरमध्ये बोलतांना जास्त आनंद होत आहे. अमेठीमध्ये अशाच एका कॉंगे्रसच्या सर्वसाधारण व्यक्तीने बोलण्यात पुढे राहणाऱ्या एका मंत्र्याचा पराभव केला. तसाच तुम्ही करा. नागपूरची चर्चा पुर्ण भारतभर होईल. अशा पध्दतीने छोट्या-छोट्या शब्दांमध्ये आणि छोट्या-छोट्या उदाहरणामध्ये आपल्या भावना व्यक्त करतांना कन्हैयाकुमारने यंदाच्या निवडणुकीमध्ये कॉंगे्रसला मतदान करण्याचे आवाहन केले.
राज्यातील काही महिला सांगतात आमच्या शिकल्या सवरल्या आया-बहिणींची किंमत 1500 रुपये असते काय?, त्यांची एवढीच किंमत शासनाकडे, सर्वत्र महागाई वाढत आहे. 2014 च्या निवडणुकीत सांगितलेले देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये येतील, दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुठे गेले हे शब्द आणि आज आम्ही त्यांच्यावर काय म्हणून विश्र्वास करायचा असा प्रश्न जनता विचारत आहे. नागपूर येथील 3 हजार लोकांच्या एका झोपडपट्टीतील लोक सांगत आहेत की, देशात समृधी महामार्ग बनले असतील पण आमच्या घराकडे जातांनाचा रस्ता मागील 30 वर्षापासून बनलेला नाही. याचे उत्तर कोणाला विचारावे. 50 खोके एकदम ओकेे असे विश्लेषण जनता सरकारचे करत आहे. सोबतच 1500 रुपयांचे आमिष दिले असले तरी आमच्या आई-बहिणी या आमिषाला बळी पडणार नाहीत असा आत्मविश्र्वास जनतेत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता झालेल्या भारतामध्ये 80 हजार कोटी लोकांना मोफत धान्य द्यावे लागत आहे. हीच आर्थिक महासत्तेची परिभाषा आहे काय असा प्रश्न लोक विचारत आहेत. या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मात्र सत्ताधारी पक्षांच्या नेतेमंडळीच्या तोंडातून निवडणुक प्रचारांच्या सभेत मिळालेले नाही.
एकंदरीत विधानसभा निवडणुकीची आजची परिस्थिती पाहता अत्यंत अवघड जागेचे दुखणे सत्ताधारी पक्षासाठी झाले आहे. या अवघड दुखण्याचे औषध मात्र जनतेकडेच आहे. जनतेने ते औषध वापरतांना याचा जरूर विचार करावा की, आपल्या औषधाने रुग्ण बरे झाले तर ते आपल्यावर उलटणार नाहीत याचा विचार करावा आणि अशाच व्यक्तीला निवडुण द्यावे की, ज्याने आपल्या सुख-दु:खासाठी झटले पाहिजे. भारताच्या संविधानाने कचरा साफ कराणारा, रिक्षा चालविणारा व्यक्ती, हातगाडेवाले, टपरीवाले, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय, महालात राहणारे या सर्वांना मतदानाचा एकच अधिकार दिलेला आहे. महालात राहणाऱ्या व्यक्तीच्या मतदानात आणि सर्वात करीब असलेल्या व्यक्तीच्या मतदानात काही एक फरक नाही. तेंव्हा आम्ही आपले मत कोणाला विकणार नाहीत याची दक्षता जनतेने घ्यावी यासाठीच वास्तव न्युज लाईव्हची ही मेहनत.
Post Views: 23