नांदेड शहरात 5 लाख 33 हजारांच्या दोन चोऱ्या


नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील मगनपुराभागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच शहरातील नंदीग्राम सोसायटीमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
शुक्ला आर्केड मगनपुरा येथे राहणारे अजयकुमार मधुकर बनदेस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.14 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 ते 15 नाव्हेंबर सकाळी 6.30 वाजेच्या कालखंडात त्यांचे बंद असलेल्या घराचे चॅनलगेटला लावलेले कुलूप आणि मुुख्य दरवाज्याचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 466/2024 प्रमाणे दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माने हे करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत 14 नोव्हेंबरच्या दुपारी 12.30 ते 15 नोव्हेंबरच्या दुपारी 12 वाजेदरम्यान नंदीग्राम सोसायटीमध्ये बंदलेले दर्शनसिंघ पुरणसिंघ रामगडीया यांचे घर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी फोडले. कपाटत ठेवलेले 2 लाख 37 हजार रुपये रोख रक्कम आणि पुजा करण्याचे जुने चांदीचे भांडे 10 हजार रुपये किंमतीचे असा 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 472/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक साने अधिक तपास करीत आहेत.






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *