नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर भाग्यनगर पोलीसांनी एका हॉटेलच्या कक्षातून दोन व्यक्तींकडून 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
15 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर पोलीस निरिक्षक रामदास शेेंडगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार नागेश वाडीयार, प्रदीप गर्दनमारे, मारोती मुसळे, सुरेश हाके असे हॉटेल तपासणी करीत असतांना छत्रपती चौकातील मिंट हॉटेलमध्ये स्वागत कक्षाात संशयीतरित्या बसलेल्या दोन व्यक्तींची तपासणी केली. त्यांच्याकडे 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम सापडली. रक्कमेबद्दल ते दोघे समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. तेंव्हा ती रक्कम जप्त करण्यात आली. यानंतर एफएसटी पथक, आयटी पथकांना या रक्कमेची सुचना देण्यात आली असून रक्कम निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी भाग्यनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 56