लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करा;बिरबल यादव यांचे जनतेला आवाहन


नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपये खर्च करून जनतेला मतदान करण्यासाठी जागृती अभियान राबवत आहे. नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ता बिरबल यादव स्वत:च आपल्या हातात ध्वनीक्षेपक व माईक घेवून मतदान करण्याचे आवाहन करत आहे ही घटना दखल योग्य आहे.
महाराष्ट्र शानाच्यावतीने आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राज्यभर कोट्यावधी रुपये खर्च करून मतदारांना मतदान करण्यासाठी जागृती करणारे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत या जागृतीची काहीच परिणाम समोर आला नाही. तरीही विधानसभा निवडणुकीत पुन्हा हा प्रचार सुरू आहे. नांदेड शहरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव हे दररोज आपल्या दैनंदिनीमधील काही वेळ काढून नल्लागुट्टाचाळ, सोमेश कॉलनी, व्यंकटेश नगर सिंदी कॉलनी, शिवशक्तीनगर या भागात आपल्या हातात ध्वनीक्षेप घेवून जनतेने लोकशाहीच्या सबली करणासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान कोणालाही करा पण मतदान करा असे सांगत आहेत. बिरबल यादव यांची मेहनत मतदान 100 टक्के करण्यापर्यंत जाईल की, नाही याची शाश्वती नसली तरी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे लोकशाहीच्या समृध्दीसाठी ते स्वत:हून प्रयत्न करत आहेत. ही बाब दखल घेण्यासारखी आहे.


Post Views: 46






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *