नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागात वाहन चालक पदावर नोकरी लावतो म्हणून नागपूर येथील एकाने नांदेडच्या एका युवकाला 18 लाख 38 हजार रुपयांचा ठकवले आहे.
शंभुराजे नवनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर 2023 ते 5 मार्च 2024 दरम्यान नागपूर येथील प्रशांत रामराव जोंधळे याने त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात वाहन चालक पदावर नोकरी लावतो म्हणून त्यांची 18 लाख 38 हजार रुपयांचा गंडवणूक केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार भारतीय दंड संहितेतील कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा क्रमांक 1070/2024 प्रमाणे दाखल कमेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे हे करीत आहेत.
Post Views: 150