नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या दोन गटामध्ये उमर कॉलनी या भागात रात्री मोठा राडा होता-होता वाचला. पोलीसांनी केलेल्या धावपळीमुळे या घटनेला मोठे स्वरुप प्राप्त झाले नाही.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या एकदम छोटासा टप्पा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे आपल्या उमेदवाराचा प्रचार हा शिगेला पोहचविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. युध्दात साम-दाम-दंड आणि भेद या चार मार्गांचा उपयोग केला जातो आणि हा मार्ग सर्वश्रुत झाला आहे. त्यामुळे कोणताही मार्ग वापरला तर कोणाला काही आक्षेप राहिलेला नाही आणि सर्वच काही चालत राहते अशी सर्वांची भावना झाली आहे.
काल रात्री शहरातील उमर कॉलनी या भागात दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा झाला अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पोलीसांनी मात्र अत्यंत जलदगतीने त्या राड्यात उतरताच सर्वांना पळता भुई थोडी केली. त्यामुळे या राड्याला मोठे स्वरुप प्राप्त झाले नाही. पण राडा करणाऱ्या गटांमधील एका गटाचा प्रमुख मागील काळामधला मोठा जुगार अड्डा चालविणारा माफिया असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण पोलीसांनी केलेल्या मेहनतीमुळेच मोठा राडा झाला नाही आणि या राड्याला मोठे स्वरुप आले नाही. याबाबत पोलीस विभागाकडे कोणतीही नोंद मात्र नाही.
Post Views: 55