नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील नंदीग्राम सोसायटीमध्ये 24 तासात दुसरी मोठी चोरी झाल्याची घटना पोलीस दप्तरी दाखल झाली आहे. या घटनेत 2 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
हरभजनसिंघ देवासिंघ पहरेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नंदीग्राम सोसायटीमधील त्यांचे घर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी 14 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7.30 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान फोडले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 2 लाख 75 हजार रोख रक्कम आणि 24 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा एकूण 2 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 474/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साखरे हे करीत आहेत.
Post Views: 70