“बैलगाडी ओढणारे की,समर्था घरचे श्वान हे एकदा जाहीर कराच तुम्ही अजितदादा’


2014 च्या निवडणुकीचे काही व्हिडिओ पहात होतो.” सुरेश खोपडे मुर्दाबाद!, ‘ .’….खाली डोक वर पाय,’ खोपडेची टोपडी… ‘अशा घोषणा देत मासाळवाडी गावकऱ्यांचा एक मोर्चा बारामती प्रांत कार्यालयावर निघाला होता. तीन दिवसा पूर्वी अजित दादांना याच गावकऱ्यांनी जाहीर प्रश्न विचारला होता की अनेक वेळा आश्वासन देऊन तुम्ही गावाला पाणी का दिले नाही.” आमच्या उमेदवाराला मत दिले नाही तर गावाचे पाणी बंद करीन” अशी धमकी अजित दादांनी दिली. बारामती लोकसभेचा एक उमेदवार असल्याने मी वडगाव पो स्टेशनला फिर्याद दिली. प्रश्न विचारणारा संदीप ठोंबरे हा भारतीय सैन्य दलात तळहातावर शीर घेऊन लढणारा सैनिक होता. त्याला दम भरत दादांनी आदेश दिला “उचला रे त्याला”. दुसऱ्याच दिवशी तो गावातून फरार झाला. त्याची आई उरबडवीत लोकांपुढे पदर पसरत माफी मागू राहिली. गाव मंदिरात बैठक घेण्यात आली. देवाचा गुलाल प्रत्येकाच्या हातात देऊन शपथ घ्यायला लावली की दादाविरुद्ध कोणी बोलणार नाही व तक्रार करणाऱ्याचा निषेध करण्यासाठी बारामतीला जाऊ.
ठाणे येथे पत्रकारांनी दादांना यावर विचारणा केली की दुसरे उमेदवार सुरेश खोपडे यांनी तुमचे विरुद्ध लेखी तक्रार केलेली आहे. दादा म्हटले “मासाळवाडी ला गेलो होतो पण मला बदनाम करण्यासाठी कुणीतरी माझा आवाज काढला. 7
हाथी चलता है और कुत्ते भुंकते है.” मग मी पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटले की दादा हे उपमुख्यमंत्री आहेत संपूर्ण पोलीस खातं त्यांच्या ताब्यात आहे मग त्यांचा खोडसाळपणे कोणी आवाज काढला त्याचा शोध का घेऊ शकले नाहीत? मी जर त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दिली आहे तर मग त्यांनी माझ्याविरुद्ध बदनामीचा खटला का दाखल केला नाही? आमच्यापैकी कोण खरं आणि कोण खोटं बोलते हे शोधण्यासाठी आम्हा दोघांची नार्को टेस्ट घेण्यात यावी त्याला माझी तयारी आहे. दादा तयार आहेत का? दादांनी नंतर या विषयावर बोलायचे टाळले. पण दुसरे दिवशी मासाळवाडी मधील गरीब, प्रामाणिक पुरुष महिलांना रस्त्यावर उभे करून माझ्या निषेधाचे फलक घ्यायला भाग पाडले. आणि तालुक्यातील त्यांच्या मलिदा गॅंग ला माझ्या विरुद्ध अर्वाच घोषणा द्यायला भाग पाडले.
हाथी चलता है…..या तुमच्या विधानानुसार कोणत्याच प्रकारे हत्ती तुमच्यात दिसत नाही .दिसतो तो माझ्या सारखा कुत्ता/श्वान.
दादा, श्वानाचे अनेक प्रकार आहेत. जंगलातील रानटी स्वान, रस्त्यावर भटकणारे, गळ्यात पट्टा बांधून पाळलेले थोरामोठ्याच्या घरातील, समर्थाच्या घरातील स्वान, बैलगाडी खालून सावलीत चालणारे श्वान ज्याला वाटते मीच गाडी चालवत आहे…….आणखी बरेच.
दादा मी आहे जंगली स्वान.जो स्वतःच्या हिमतीवर शिकला स्पर्धा परीक्षेतून क्लासवन अधिकारी बनला. मानव उत्क्रांतीत माझी पहिलीच शिकलेली पिढी. बारामती तालुक्यातील जी बावीस गावे आजही दुष्काळी आहेत त्यातील माझा जन्म. 72 च्या दुष्काळात दुष्काळी कामे केली. तुम्ही वाढला ते बारामतीच्या उसाच्या पट्‌ट्यात. त्याच पट्‌ट्यात गुळ बनविणाऱ्या गुळव्याचे काम करत माझ्या वडिलांनी आम्हाला वाढविले. तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती एका प्रचंड सामाजिक भान असलेल्या व करिष्मायुक्त नेतृत्व असलेल्या कुटुंबाची. त्यामुळे तुम्हाला खरे दारिद्र्य, सामाजिक, राजकीय संघर्ष माहित नाही. कोणतीही सामाजिक कार्याची व शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना तुम्ही एकदम दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये गेला. भोवताली भुंकणाऱ्या श्वानांना न घाबरण्याची ताकद ही तुम्ही कमावलेली नाही. कारण तुम्ही मुळातच समर्था घरचे स्वान आहात. त्यामुळे तुम्हाला कोणी प्रतिप्रश्न करू शकले नाहीत. शिवाय तुम्ही कामाची जी फुशारकी मारता ते तुमचे कर्तुत्व नव्हे. तुम्ही फक्त साखरेच्या पोत्याने भरलेल्या गाडी खालून सावलीतून चालत आहात. गाडी ओढायचे काम बैल करत आहेत. तुम्हाला व तुमच्या मलिदा गॅंगला वाटते की तुम्हीच गाडी ओढत आहात.
टीव्ही वर मुलाखत देताना स्वतःला हाथी समजता पण नार्को टेस्ट करू या म्हटले की मुंगीच्या बिळात पळून जाता. आणि गरीब पाप भिरू शेतकरी महिला पुरुषांना पुढे करून बारामती शहरात माझ्याविरुद्ध घोषणा द्यायला भाग पाडले. तुम्ही स्वतः रस्त्यावर का उतरला नाही? सामान्य माणसांनी घाम गाळून भरलेली राज्याची तिजोरीवर डल्ला मारून स्वतःची तुंबडी का भरत आहात? कोणत्या प्रकारचे लोकशाही मॉडेल तुम्ही महाराष्ट्राला देत आहात? स्वतःला श्वान समजत असाल तर ते माझ्यासारखे स्वाभिमानी स्व कष्टावर उभे राहणारे नसून समर्था घरचे, तसेच बैलगाडी खाली चालणारे पण स्वतः बैलगाडी चालवतो असा आभास असलेले श्वान तुम्ही जनतेसमोर उभे करीत आहात. म्हणून दादा तुम्ही ऍक्टिव्ह राजकारणातून मोकळे व्हा. राजकारण,समाजकारण, माणुसकी, लायकी नसतानाही तुम्हाला मोठे केले त्याचे ऋण मानने याचे ज्ञान मिळवा व पुढील पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूक लढवा. किंवा जनतेने दादांना पाच वर्षाची सुट्टी द्यावी त्या काळात ते राजकारण समाजकारण माणुसकी याचे शिक्षण घेतील मग आम्ही सर्वजण पुन्हा त्यांना बहुमताने नक्कीच निवडून देऊ.
-सुरेश खोपडे


Post Views: 72






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *