मतदानाच्या दिवशी 200 मिटरपासून आत कोणी चपला घेवून आता आला तर आचार संहितेचा भंग होईल म्हणे


नांदेड(प्रतिनिधी)-243-परंडा विधानसभा क्षेत्रातील एका उमेदवाराने दिलेल्या अर्जामुळे खळबळ माजली आहे. त्या अर्जाप्रमाणे मतदानाच्या दिवशी कोणीही अधिकारी, कर्मचारी, मतदार आणि निवडणुक प्रतिनिधी पायात चपला घालून मतदान कक्षात येवू शकत नाहीत. कारण त्या उमेदवाराला मिळालेली निशाणी चपला आहेत.
243 परंडा विधानसभा क्षेत्र जि.धाराशिव येथील अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी परंडा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला दिलेला एक अजब अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यासाठी नक्कीच त्रास दायक आहे. गुरूदास संभाजी कांबळे हे अरनगाव ता.परंडा जि.धाराशिव यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा उमेदवार अनुक्रमांक 12 आहे आणि त्यांना मिळालेली निशाणी ही चपला आहेत.
या निशाणीला अनुसरून त्यांनी निवडणुक आचार संहितेचा भंग होवू नये म्हणून एक अर्ज दिला आहे. निवडणुक आचार संहितेत कोणतीही निशाणी जी उमेदवारांना मिळाली आहे ती प्रदर्शित करता येत नाही, प्रकाशित करता येत नाही. म्हणून त्यांच्या अर्जात त्यांनी असे लिहिले आहे की, माझी निशाणी चपला असल्यामुळे मतदान केंद्रापासून 200 मिटरच्या आत कोणीही व्यक्ती चपला घालून फिरेल तर तो निवडणुक आचार संहितेचा भाग होईल.
यानुसाार गुरुदास संभाजी कांबळे यांची मागणी आहे की, दि.20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून 200 मिटर परिसरात कोणताही अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतदार यांना 200 मिटर अगोदरच चपला सोडून येण्यासाठी सुचित करावे. या अर्जावर आता परंडा विधानसभा क्षेत्रातील निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला नक्कीच घाम सुटला असेल.


Post Views: 158






  • Related Posts

    लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट)

    लोक सभा के उपचुनाव नवंबर-2024 के रूझान एवं परिणाम लोक सभा क्षेत्र 16 – नांदेड़ (महाराष्ट) . क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत…

    विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट)

    विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के आम चुनाव नवंबर- 2024 के रूझान एवं परिणाम विधानसभा क्षेत्र 86 – नांदेड़ उत्तर (महाराष्ट) राउंड वाइज स्थिति, 6/26 क्रम संख्या. अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *