नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील 1995 आणि 2002 पासून फरारी आणि पाहिजे असलेल्या सदरातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे यांनी पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पकडले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 आणि 22 वर्षापासून फरार असलेले दोन आरोपी त्यांनी पकडले आहेत. नांदेड शहरातील संजय लक्ष्मण कचरे (52) आणि अरुण नारायण इंगोले या दोघांनी अनुक्रमे 1995 आणि 2002 मध्ये मारहाण करून फरार होते. पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, पोलीस अंमलदार शंकर म्हैसनवाड, हेमवती भोयर, सुधाकर देवकत्ते आदींनी याा दोघांना पकडले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 244